E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
सुवर्णपदकासाठी भारत-पाकिस्तानमध्ये आज लढत
Samruddhi Dhayagude
03 Oct 2026
निशिन : आशियाई स्पर्धेत क्रिकेटमधील सर्वांत मोठी लढत निश्चित झाली आहे. पुरुषांच्या सुवर्णपदकाच्या सामन्यात आज (शनिवारी) भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. सामना सकाळी १० वाजता सुरू होईल, तर नाणेफेक सकाळी ९.३० वाजता होणार आहे.
दोन्ही संघांनी गुरुवारी आपापल्या उपांत्य सामन्यात शानदार विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. भारताने श्रीलंकेचा १२४ धावांनी, तर पाकिस्तानने पावसामुळे १३ षटकांच्या करण्यात आलेल्या सामन्यात बांगलादेशचा सहा गडी राखून पराभव केला. भारताने श्रीलंकेचा १२४ धावांनी धुव्वा उडवला होता. भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत १६९/७ धावा केल्या. आव्हानात्मक खेळपट्टीवर ईशान किशनने नाबाद ८० धावांची शानदार खेळी करत भारताला मजबूत धावसंख्या उभारून दिली. वैभव सूर्यवंशीनेही ३८ धावांचे योगदान दिले. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेच्या फलंदाजीची वाताहत केली. जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल आणि अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. श्रीलंकेचा डाव अवघ्या ४५ धावांत आटोपला. भारताने १२४ धावांनी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली.दुसर्या उपांत्य सामन्यात पावसामुळे पाकिस्तान-बांगलादेश सामना १३-१३ षटकांचा करण्यात आला. पाकिस्तानने सहा गडी राखून विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. टी-२० क्रिकेटमध्ये भारताचे वर्चस्व राहिले आहे.
Related
Articles
महापालिका कर्मचार्यांच्या दिवाळी बोनसचा मुहूर्त आचारसंहितेमुळे रखडला
12 Oct 2026
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
09 Oct 2026
दोन हजार 578 ग्राहकांनी घेतला सूर्यघर योजनेचा लाभ
14 Oct 2026
वर्षभरासाठी पिण्याच्या पाण्याचे नियोजन; जलसाठ्याच्या वापरावर निर्बंध
13 Oct 2026
यशस्वीकडून यष्टिरक्षणाचा सराव
09 Oct 2026
आठवडाभरात मिरच्यांच्या दरात 20 रुपये वाढ
08 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात