E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
साखरेचे दर कमी होणार?
Samruddhi Dhayagude
03 Oct 2026
वृत्तवेध
सणासुदीच्या काळात साखरेचा सर्वाधिक वापर होत असतानाच वाढलेल्या दरांनी ग्राहकांच्या चिंतेत भर पडली आहे; मात्र आता साखरेच्या वाढत्या किमतींपासून ग्राहकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. देशातील साखर रिफायनरींकडून देशांतर्गत बाजारात सुमारे अडीच लाख टन साखर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात साखरेच्या दरांवर नियंत्रण येण्याची शक्यता आहे.
‘श्री रेणुका शुगर्स’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय रिफायनरी देशांतर्गत बाजारात सुमारे २.५ लाख टन रिफाइन्ड साखर विकण्याची योजना आखत आहेत. बाजारातील साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. सणासुदीच्या काळात साखरेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. मिठाई, घरगुती पदार्थ आणि विविध खाद्यपदार्थांमध्ये साखरेचा वापर वाढल्याने या काळात तिच्या किमती वाढण्याची शक्यता असते. ग्राहकांना सणासुदीच्या काळात साखरेच्या वाढलेल्या दराचा फटका बसू नये, यासाठी सरकार आणि साखर रिफायनरींकडून दर कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. देशांतर्गत बाजारात अडीच लाख टन साखरेचा साठा उपलब्ध करून देण्याचा निर्णय त्याचाच एक भाग असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी साखरेच्या किमतीत घट झाल्याचे चित्र दिसले होते. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशातील साखरेचा सरासरी किरकोळ दर प्रति किलो ६५.०८ रुपयांवरून ६२.५७ रुपयांवर आला आहे; मात्र घाऊक बाजारातील दरात मोठी घट झाल्यानंतरही त्याचा अपेक्षित फायदा सामान्य ग्राहकांना मिळालेला नाही. साखरेच्या घाऊक दरात प्रति किलो १७ रुपयांपर्यंत घट झाल्याचे वृत्त आहे. मिलस्तरावर म्हणजेच ‘एक्स-मिल’ किमतीतही प्रति किलो १७ ते २० रुपयांपर्यंत मोठी घट झाली आहे; मात्र किरकोळ बाजारात ग्राहकांना साखर केवळ दोन ते तीन रुपये कमी दराने मिळत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे घाऊक बाजारातील दरातील घसरणीचा फायदा किरकोळ ग्राहकांपर्यंत पूर्णपणे पोहोचत नसल्याचे चित्र आहे.
आता रिफायनरींकडून अडीच लाख टन साखर देशांतर्गत बाजारात आणली गेल्यानंतर पुरवठा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखरेच्या किमतींवर आणखी दबाव येऊन ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. विशेषतः सणासुदीच्या काळात बाजारात साखरेचा अतिरिक्त साठा उपलब्ध झाल्यास किरकोळ दरातही घट होण्याची अपेक्षा आहे.
Related
Articles
उसाला योग्य दर मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही
14 Oct 2026
कात्रज बोगद्याजवळ उभ्या कंटेनरला दुचाकीची धडक
13 Oct 2026
आत्महत्याग्रस्त माळी कुटुंबाला राजेंद्र राऊत यांनी दिला आधार
08 Oct 2026
मसापच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या बिनविरोध निवडीवर आक्षेप
13 Oct 2026
ऐनवेळी प्रश्नपत्रिका तयार कराव्यात
14 Oct 2026
सुग्रीवाचे कुंभकर्णाला युद्धाचे आव्हान
12 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात