E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
व्यासपीठ
वाचक लिहितात
Samruddhi Dhayagude
03 Oct 2026
सरकारी भ्रष्टाचाराचा पुरावा
भारतात आता भ्रष्टाचार होत नसल्याचा दावा भाजपचे केंद्र सरकार सातत्याने करत आहे. ’आधीची’ सरकारे भ्रष्ट होती, असा त्यांचा जुना आरोप आहे. देशातील भ्रष्टाचाराबद्दल इतर देशांचे मत काय आहे ते सहसा सामान्य जनतेसमोर येत नाही, त्यामुळे सरकारच्या प्रचाराला आव्हान दिले जात नाही; मात्र अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या ताज्या अहवालातून समोर येणारे चित्र वेगळे आहे. निवडक इंग्रजी वृत्तपत्रांनी या संबंधीचे वृत्त नुकतेच दिले आहे. थेट परकीय गुंतवणुकीचे भारत स्वागत करतो याचा त्यात उल्लेख आहे; पण अमेरिकन गुंतवणूकदारांना खुलेपणा व ’आर्थिक राष्ट्रवाद’ यांच्यात कसरत करावी लागते असे अहवालात म्हटले आहे. हा कथित राष्ट्रवाद कोण जोपासतो ते भारतीयांना आता माहीत झाले आहे. त्याच अहवालात ’नियामक यंत्रणांमधील भ्रष्टाचाराचा धोका’ थेट गुंतवणुकीत अडथळा ठरत असल्याचेही म्हटले आहे. रेल्वे, सरकारी तेल कंपन्या, हिंदुस्तान एअरॉनॉटिक्स अशा कंपन्यांमधील अधिकार्यांना परवाने मिळवण्यासाठी अमेरिकन कंपन्यांनी मोठी लाच दिल्याची प्रकरणे उघड झाली होती; मात्र भारतातील माध्यमांनी तिकडे पुरेसे लक्ष न दिल्याने त्याचा गवगवा झाला नाही. आता अमेरिकन सरकारच्या ताज्या अहवालाने सरकारी पातळीवरील भ्रष्टाचाराचा पुरावाच समोर आणला आहे.
मुकुंद आबनावे, मुंबई
पाच कोटी मुले स्वच्छतागृहाविना
जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफ यांच्या संयुक्त देखरेख कार्यक्रमात एका शाळेविषयी अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार जगातील विना स्वच्छतागृहाशिवाय काही देशातील मुलांची आकडेवारी दिली आहे. जगात २४ कोटीहून अधिक मुले स्वच्छतागृहाविना आहेत. भारतात पाच कोटी मुले अशा वर्गात मोडतात. भारताखेरीज इतर देशातील अशा मुलांची आकडेवारी या प्रमाणे आहे. नायजेरिया ३.४० कोटी, इथिओपिया २.६० कोटी, कांगो १.१० कोटी, इंडोनेशिया ८० लाख शाळांमध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध नसलेल्या मुलांची संख्या भारतात तब्बल दोन कोटी आहे, ही बातमी नुकतीच वाचण्यात आली. एकूणच स्वातंत्र्यानंतर सुमारे सात दशकानंतरसुद्धा एवढी विदारक अवस्था विद्यार्थ्यांच्या स्वच्छतागृहाबाबत असेल, तर त्याचा गांभीर्याने विचार व्हावयास हवा. देशातील सर्वच राज्य सरकारांनी योजनाबद्ध कार्यक्रम राबवून विद्यार्थ्यांना स्वच्छतागृहाच्या सोयी उपलब्ध करून द्याव्यात.
शांताराम वाघ, पुणे
श्रीमंतीचे प्रदर्शन धोकादायक
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या बातमीत समाज माध्यमांवर प्रसिद्ध झालेल्या माहितीचा गैरफायदा घेत घरात चोरी झाल्याचे समोर आले. ही घटना समाज माध्यम वापरकर्त्यांसाठी निश्चितच सावध करणारी आहे. महागडे दागिने, रोकड, आलिशान घर, नवीन वाहन, परदेशातील प्रवास, घरातील मौल्यवान वस्तू, मोठ्या समारंभातील खर्च यांचे फोटो आणि व्हिडिओ सर्रास प्रसिद्ध केले जातात. हे केवळ आनंदाचे प्रदर्शन वाटत असले तरी गुन्हेगारांसाठी ही माहिती महत्त्वाची ठरू शकते. एखादी व्यक्ती घराबाहेर गेल्याचे किंवा काही दिवस पर्यटनासाठी गेल्याचे समाज माध्यमावर जाहीर केल्यास त्या व्यक्तीचे घर रिकामे असल्याची माहिती अनोळखी व्यक्तींना सहज मिळू शकते. त्यामुळे चोरी, फसवणूक किंवा इतर गैरप्रकारांना अप्रत्यक्षपणे संधी मिळू शकते. लहान मुले, कुटुंबातील सदस्य, घराचा पत्ता, शाळेचे नाव, रोजची दिनचर्या, कार्यालयाची माहिती, प्रवासाचे वेळापत्रक किंवा आपण सध्या कुठे आहोत, याची माहिती सार्वजनिकपणे देणे टाळले पाहिजे. कौटुंबिक वाद, आर्थिक व्यवहार, वैयक्तिक कागदपत्रे, मोबाईल क्रमांक, ओळखपत्रे, बँकविषयक माहिती यांसारख्या गोष्टी समाज माध्यमांवर शेअर करणेही धोकादायक ठरू शकते.
श्याम ठाणेदार, दौंड, जिल्हा पुणे
जीवावर बेतणारा आनंद नको
रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनार्यावर पुण्याच्या ८ शाळकरी विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून झालेला मृत्यू मन विषण्ण करणारा आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा समुद्र पर्यटनाच्या सुरक्षेचा आणि पर्यटकांच्या बेफिकीरीचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. यापूर्वी १ फेब्रुवारी २०१६ रोजी रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा समुद्रकिनार्यावर पुण्यातील इनामदार कॉलेजच्या १३ विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. २१ जानेवारी २०२३ रोजी काशिद समुद्रकिनार्यावर घडलेली घटना देखील अत्यंत दुर्दैवी होती. कन्नड तालुक्यातील साने गुरुजी विद्यालयाच्या २ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला आणि आता ही दिवेआगरची दुर्घटना. या सर्व दुर्घटनांमधील साम्य म्हणजे सहलीसाठी आलेल्या तरुण विद्यार्थ्यांना समुद्राच्या पाण्याचा, ओहोटीचा आणि लाटांच्या वेगाचा अंदाज न येणे. पर्यटनाचा आनंद घेत असताना स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे आणि खोल पाण्यात उतरणे टाळणे किती गरजेचे आहे हेच या दुर्घटनांवरून पुन्हा पुन्हा अधोरेखित होत आहे. अवघ्या १७-१८ वर्षांच्या मुलांचा अकाली मृत्यू होणे यासारखी चटका देणारी दुसरी कोणतीही गोष्ट असू शकत नाही. अशावेळी समुद्र पर्यटनाचा आनंद लुटताना तो कोणाच्याही जीवावर बेतणार नाही, याचे भान सर्वांनीच ठेवायला हवे.
प्रदीप मोरे, अंधेरी (पूर्व), मुंबई
Related
Articles
देशभरात बेधुंदशाही; जनतेचे ऐकणार कोण?
06 Oct 2026
शिक्षणसंस्थांना अधिक स्वायत्तता देणे आवश्यक : डॉ. अनिल काकोडकर
05 Oct 2026
इंडिगो कंपनीचा विमान प्रवास महागला
06 Oct 2026
एक हजार 493 शेतकर्यांचे पंचनामे पूर्ण
04 Oct 2026
मुळा-मुठा प्रदूषणमुक्तीसाठी 1 हजार 438 कोटींचा आराखडा
07 Oct 2026
नरसिंग गिरजी गिरणीची दगडी भिंत केली जमीनदोस्त
08 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान