गोव्यामध्ये ८८ जणांचे फॉर्म सहा स्वीकारले   

पणजी : गोव्यात ९७ पैकी ८८ जणांनी मतदार यादीत नावे पुन्हा समाविष्ट करण्यासाठी फॉर्म सहा दाखल केले होते. ते स्वीकारले गेले आहेत, अशी माहिती राज्य मुख्य निवडणूक अधिकार्‍यांनी दिली. 
 
राज्यात विशेष मतदार यादी पुनरावलोकन (एसआयआर) राबविण्यात आली होती. त्या अंतर्गत ९७ जणांची नावे वगळली होती. त्यापैकी ८८ जणांनी नावे यादीत पुन्हा समाविष्ट करण्यासाठी फॉर्म सहा भरले होते. ते स्वीकारले गेले आहेत, अशी माहिती  गोव्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी स्पष्ट केले. भारतीय निवडणूक आयोगाने फॉर्म सहा भरुन पात्र मतदारांना नाव यादीत समाविष्ट करुन घेण्याचा अधिकार दिला आहे. अधिकार्‍यांनी सांगितले की, ९७ पैकी ८८ जणांचे अर्ज स्वीकारले आहेत. त्यापैकी तिघे पोर्तुगीज पासपोर्टधारक आहेत आणि सहा मतदार ’सध्या भारताबाहेर’ आहेत. त्यांच्याशी संपर्क साधला जात आहे. दरम्यान, एका इंग्रजी वृत्तपत्राने दावा केला होता की, निवडणूक आयोगाच्या सॉफ्टवेअरने मतदारांची नावे स्वीकारली नव्हती म्हणून ती वगळली गेली होती. त्यावर निवडणूक अधिकार्‍यांनी सांगितले की, बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) यांनी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यापूर्वी नावे वगळलेल्या ९७ जणांच्या घरी फेब्रुवारी २०२६ मध्ये भेटी दिल्या होत्या आणि त्यांना फॉर्म सहा भरण्यास सांगितले होते. त्यापैकी अनेकांनी अर्ज भरले असून अन्य जणांची प्रक्रिया सुरू आहे. कोणताही पात्र व्यक्ती मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून दूर राहू शकत नाही, असे अधिकार्‍यांनी २४ सप्टेेबर रोजी यादीतील नावे वगळण्यावरुन वाद झाल्यानंतर सांगितले होते. 
 

Related Articles