E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
वैमानिक स्मित मच्छार यांच्या शौर्याचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक
Samruddhi Dhayagude
02 Oct 2026
नवी दिल्ली : स्वत:च्या प्राणाची बाजी लावून १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे भारतीय वैमानिक स्मित मच्छार यांच्या शौर्याचे कौतुक प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले. पंतप्रधान मोदी यांनी मच्छार यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला या वेळी मच्छार यांनी सांगितले की सह-वैमानिकाने केलेल्या हल्ल्यानंतर, प्रवाशांचा जीव वाचविण्याचा दृढ निश्चय केला होता. शरीरात उरलेल्या त्राणाचा अधिकाधिक वापर केला आणि विमान पडण्यापासून रोखले. सध्या दुबईत मच्छार यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, दुबई ते इस्रायलची राजधानी तेलअविव असा प्रवास करणारे फ्लायदुबई विमान फ्लाइट एफझेड १०७३ च्या कॉकपिटमध्ये तीन दिवसांपूर्वी (बुधवारी) चाकू हल्ल्याची घटना घटना घडली होती. मोदींशी बोलताना मच्छार यांनी सांगितले की, मी हनुमंताचा भक्त आहे. संकट काळात मी नेहमी हनुमान चालिसाचे गायन करत आलो आहे. हल्ल्यानंतर मी स्वत:चा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होतो. पण, अशा संकटातही प्रवाशांचा जीव वाचवायाचा आहे, याचे मला भान होते. डोळे मिटले असताना विमानातील घडणार्या हालचालीवर लक्ष होते. विमान खाली जात असल्याची जाणीव देखील झाली. मारहाण आणि चाकू हल्ल्यात जखमी झालो असताना मी निश्चय केला की आता उठायचे आहे. तशी मनाशी खूणगाठ बांधली आणि कॉकपिटचा दरवाजा उघडला. त्यानंतर अन्य प्रवासी मदतीस धावले. त्यांची भूमिका वाखाणण्यासारखी होती. रुग्णालयातील पलंगावर जखमी अवस्थेत डोक्याला पट्टी बांधलेले मच्छार यांनी सांगितले की, गेली सतरा वर्षे विमाने उडवत आलो आहे. त्यामध्ये ११ वर्षे कॅप्टन म्हणून काम केले. मच्छार यांच्या धैर्याचे कौतुक करताना मोदी म्हणाले, मच्छार यांनी क्षणात निर्णय घेतला. त्यामुळे प्रवाशांचे प्राण वाचले. या घटनेमुळे असे स्पष्ट झाले की, भारतीय हे जीव घेणारे नाहीत, तर इतरांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःच्या जिवाची बाजी लावणारे आहेत. धैर्याचे कौतुक करणार्या मोदी यांना मच्छार यांनी सांगितले की, मी भारतापासून दूर असलो तरी मी संस्कृतीपासून दूर नाही. या वेळी मोदी म्हणाले, तुमची प्रकृती सुधारावी यासाठी मंदिरात प्रार्थना केली जात आहे. अनेक भारतीय मृत्युंजय महामंत्राचा जप करत आहेत. तुम्ही शूर आहात आणि तुमच्या स्वागतासाठी देश उत्सुक आहे. त्यावर मच्छार यांनी सांगितले की, घटना माझ्या जीवन प्रवासातील घटना आहे. मी लवकरच बरा होईन, असा विश्वास आहे. पंतप्रधानांशी बोलण्याची संधी मिळाली याचा मला अभिमान वाटतो.
Related
Articles
डिझेल दरवाढीला बसणार लगाम
04 Oct 2026
नगरपंचायतीमधील अधिकारी गायब; नागरिकांचे हेलपाटे
06 Oct 2026
माझे एक्स हँडलवर बंदीचे आश्चर्य नाही
03 Oct 2026
आंबेगाव तालुक्यात शनिवारी भाद्रपद बैलपोळा
08 Oct 2026
जिल्हाधिकार्यांकडून दुष्काळाची पाहणी
03 Oct 2026
जिल्हा स्तरावर ५०० विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह
09 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान