जीएसटी संकलनात किंचित वाढ   

नवी दिल्ली : देशातंर्गत व्यवहार आणि आयातीतून मिळणार्‍या करामुळे सप्टेंबर महिन्यात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलन २.०३ लाख कोटींवर पोहोचले. ऑगस्ट महिन्यात केंद्राला जीएसटीपोटी १.९९ लाख कोटींचा तर जुलैमध्ये २.११ लाख कोटींचा महसूल मिळाला होता. देशांतर्गत व्यवहारांमधील करसंकलन १०.१ टक्क्यांनी वाढून १.३८ लाख कोटींवर पोहोचले. तर, आयातीतून मिळणारा महसूल २६ टक्क्यांनी वाढून ६५,५२५ कोटींवर पोहोचला. याच कालावधीत जीएसटी परतावा घटून २७ हजार कोटींवर आला. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ३ टक्क्यांची घट झाली आहे. सप्टेंबरमध्ये परताव्याची रक्कम वजा केल्यानंतर निव्वळ जीएसटी संकलन १८.१ टक्क्यांनी वाढून १.७६ लाख कोटींवर पोहोचले. चालू आर्थिक वर्षात जीएसटी संकलनाने २ लाख कोटींचा टप्पा ओलांडण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी, एप्रिल आणि जुलै महिन्यात जीएसटी महसुलाने अनुक्रमे २.४३ लाख कोटी आणि २.११ लाख कोटींचा उच्चांक गाठला होता. 

Related Articles