E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अर्थ
व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ
Samruddhi Dhayagude
02 Oct 2026
विमान प्रवासही महागणार
नवी दिल्ली : व्यावसायिक सिलिंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. याचबरोबर, जेट इंधनाच्या किमतीत (एव्हिएशन टर्बाइन फ्युएल-एटीएफ) किमतीतही वाढ झाली आहे. त्यामुळे विमान प्रवास आणि घराबाहेरील जेवण महागणार आहे.हॉटेल आणि रेस्टॉरंटसाठी लागणार्या व्यावसायिक सिलिंडरच्या (१९ किलो) दरात ६२.५० रुपयांची वाढ करण्यात आली. तर, देशांतर्गत विमान कंपन्यांसाठी जेट इंधन किंवा एटीएफचा दर आता प्रति लीटर १२१ रुपयांवरून १३७ रुपये झाला आहे.
ऑगस्ट महिन्यात एटीएफच्या दरात प्रति लीटर पाच रुपये, सप्टेंबर महिन्यात ६.२६ रुपये (५.४६ टक्के) वाढ करण्यात आली होती. ऑक्टोबर महिन्यात यात तब्बल १६ रुपयांची वाढ झाली आहे. विमान कंपन्यांचा सर्वाधिक म्हणजे जवळपास ४० टक्के खर्च इंधनावर होतो. त्यामुळे हवाई प्रवास महागणार आहे.
व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ६२.५९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अनुक्रमे १८३.५० आणि १९२ रुपयांची कपात करण्यात आली होती. तर, सप्टेंबर महिन्यात ९.५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. मागील दोन महिन्यात व्यावसायिक सिलिंडरच्या दरात सुमारे ७२ रुपयांची वाढ झाली आहे.
पश्चिम आशियातील संघर्षाआधी व्यावसायिक सिलिंडर १,७४०.५० रुपये दराने मिळत होता. दरम्यानच्या काळात यात १,३७३ रुपयांची प्रचंड वाढ झाली. त्यामुळे जून महिन्यात व्यावसायिक सिलिंडर विक्रमी ३,११३.५० रुपयांवर पोहोचला होता. घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे १४.२ किलोचा घरगुती सिलिंडरचा दर ९४२ रुपयांवर कायम आहे.घरगुती सिलिंडरच्या दरात ७ जून रोजी २९ रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्याआधी, मार्च महिन्यात ६० रुपयांची वाढ करण्यात आली होती.
Related
Articles
टँकरच्या घोटभर पाण्यावर आष्टीकरांची तहान; १३ गावांचे प्रस्ताव प्रतीक्षेत
13 Oct 2026
वर्षा विगत,शरद ऋतु आयी...
11 Oct 2026
शहरात 14 दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू
11 Oct 2026
बँक ठेवी आणि शेअर्सची माहिती आता एकाच विवरणपत्रात
12 Oct 2026
व्हॉट्सऍप कट्टा
09 Oct 2026
महिला नेत्यांसाठी एआय आधारित नवे व्यासपीठ
09 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात