मच्छार यांच्यासह चार प्रवाशांनी दाखवले धाडस   

अबु धाबी : फ्लाय दुबईच्या ‘एफझेड १०७३’ या विमानात हवेतच सहवैमानिकाने मुख्य वैमानिकावर चाकूने हल्ला केल्याने मोठा थरार निर्माण झाला. हल्ल्यानंतर विमानाचा ताबा सुटून ते वेगाने खाली येऊ लागले. मात्र, भारतीय वैमानिकासह चार प्रवाशांनी दाखवलेल्या धाडसामुळे मोठी विमान दुर्घटना टळली आणि शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले.
 
हल्ल्यात गंभीर जखमी होऊनही भारतीय मुख्य वैमानिक स्मित मच्छार यांनी प्रसंगावधान राखले. रक्तबंबाळ अवस्थेतही त्यांनी कॉकपिटचा दरवाजा उघडला. त्यामुळे प्रवाशांना आत प्रवेश करून हल्लेखोराला रोखता आले.यानिव हायुन : व्यवसायाने प्लंबर असलेले यानिव हायुन यांनी दरवाजा उघडताच कॉकपिटमध्ये धाव घेतली. त्यानंतर इतर प्रवाशांच्या मदतीने हल्लेखोराला पकडून त्याच्यावर नियंत्रण मिळवले.
 
असाफ राजुआन : विमा प्रतिनिधी असलेले असाफ राजुआन हे इतर तीन प्रवाशांसोबत कॉकपिटमध्ये दाखल झाले. विमान वेगाने खाली येत असतानाही त्यांनी धैर्याने हल्लेखोराला रोखण्यास मदत केली.
 
झ्विका मेन्स : बँक लेउमीच्या विमा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी झ्विका मेन्स यांनी प्रसंगावधान दाखवत विमानातील ध्वनियंत्राच्या तारेचा वापर करून हल्लेखोराला बांधले.
 
शोता मुसायेव : व्यवसायाने दंतवैद्य असलेले शोता मुसायेव यांनी हल्लेखोराला नियंत्रणात आणल्यानंतर गंभीर जखमी कॅप्टन माछर यांच्यावर तातडीने प्राथमिक उपचार सुरू केले. विमान उतरेपर्यंत त्यांनी माछर यांचा रक्तस्राव थांबवण्याचा प्रयत्न केला. माछर यांच्यासह या चार जणांच्या धाडसामुळे फ्लाय दुबईचे विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आले आणि मोठी दुर्घटना टळली.
 

Related Articles