E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
एसआयआरच्या नावाखाली ४५ लाख नावे हटविण्याचे कारस्थान
Samruddhi Dhayagude
02 Oct 2026
कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांचा आरोप
बंगळुरु : कर्नाटकाचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी मतदारांच्या विशेष तीव्र पडताळणी (एसआयआर) मोहिमेच्या नावाखाली ४५ लाख मतदारांची नावे यादीतून हटविण्याचे कारस्थान सुरू असल्याचा आरोप करत येथील निवडणूक अधिकारी कार्यालयात मंत्र्यांसमवेत बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले.
एसआयआरच्या नावाखाली मतदारयादीतून मोठ्या संख्येने मतदारांची नावे वगळण्यासाठी काही व्यक्तींकडून अनेक अर्ज दाखल केले जात असल्याचा आरोपही शिवकुमार यांनी केला. हे मोठे कारस्थान असून, मतदारांची घोर फसवणूक सुरू असल्याचे शिवकुमार यांनी तत्पूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. तसेच, भाजपवर मतदार यादीतून अल्पसंख्याक, दलित आणि अनुसूचित जमातीच्या मतदारांची नावे वगळण्याच्या आरोप केला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या माहितीशिवाय मतदारांची नावे बेकायदेशीरपणे वगळली जाणे अशक्य आहे, असा दावाही त्यांनी केला. भाजप आणि जनता दलाच्या नेत्यांचे यात मोठे कारस्थान आहे, असा आरोपही त्यांनी केला.पात्र मतदारांची नावे वगळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ’फॉर्म-७’ दाखल केले जात असून, ४५ लाखांहून अधिक मतदारांच्या बाबतीत यादीत विसंगती असल्याचे दिसून आले आहे. ’फॉर्म-७’ हा मतदारयादीतील नाव समाविष्ट करण्याबाबत किंवा वगळण्याबाबत आक्षेप नोंदवण्यासाठीचा अर्ज आहे.
Related
Articles
वाचक लिहितात
07 Oct 2026
अमेरिकेच्या लष्करातील अधिकार्यांची संख्या घटणार
04 Oct 2026
पाकिस्तानात धार्मिक स्थळांच्या सुरक्षेची मागणी
09 Oct 2026
भारतीय खेळाडूंची पदकांची लयलूट
03 Oct 2026
कमी पावसामुळे बटाटा उत्पादनात घट
03 Oct 2026
मुंबईच्या रणजी संघातून सूर्यकुमारला वगळले
07 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान