E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
अभियंते, कर्मचार्यांना मुख्यालय न सोडण्याचे आदेश
Samruddhi Dhayagude
02 Oct 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महावितरणचा निर्णय
मुंबई, (प्रतिनिधी): राज्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असताना वीजपुरवठा सुरळीत रहावा, पाणीपुरवठ्यात अडचण येऊ नये यासाठी महावितरणने संपूर्ण यंत्रणा अतिदक्ष ठेवली आहे. दुष्काळी परिस्थितीत वीजपुरवठा खंडित झाल्यास तो तातडीने पूर्ववत करण्यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांतील अभियंते, यंत्रचालक आणि तारमार्ग कर्मचार्यांनी आपापल्या मुख्यालयात उपस्थित राहावे, असे सक्त आदेश महावितरणने दिले आहेत. पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडणार्या अधिकारी-कर्मचार्यांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. महावितरणचे संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी याबाबत परिपत्रक जारी केले आहे. जूनपासून राज्यातील पर्जन्यमानात मोठी तूट नोंदवण्यात आली असून, अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम शेती पिकांवरही झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दुष्काळ निवारणासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यानुसार, महावितरणनेही वीजपुरवठ्याबाबत विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव तथा महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या आदेशानुसार महावितरणच्या वरिष्ठ अधिकार्यांनी विविध परिमंडलांचा तातडीने दौरा केला. दुष्काळाच्या काळात पाणीपुरवठा आणि शेतीसाठी वीजपुरवठा अधिक महत्त्वाचा ठरणार असल्याने वीजयंत्रणेत बिघाड झाल्यास दुरुस्ती पथकांनी तातडीने कार्यरत व्हावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्यास पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देणे किंवा तातडीने दुरुस्ती करून वीजपुरवठा पूर्ववत करण्यावर भर देण्यात आला आहे.
हयगय केल्यास शिस्तभंगाची कारवाई
दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता क्षेत्रीय कार्यालयांतील सर्व अभियंते, यंत्रचालक आणि तारमार्ग कर्मचार्यांनी मुख्यालयात उपलब्ध राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचार्याला पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही.
Related
Articles
कॅप्टन मच्छार यांच्या शौर्याची मोहोर टपाल खात्याचे विशेष पाकिटावर
09 Oct 2026
न्यायालयाच्या निर्देशानंतरही विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच
08 Oct 2026
दहशतवादी कारवायांतील आरोपी गुन्हेगार घोषित
08 Oct 2026
दिव्यांग विद्यार्थ्यांना घडविणार्या शिक्षकांचा गौरव
08 Oct 2026
आता चौकशी आणि कारवाईची कसोटी
13 Oct 2026
कात्रज-कोंढवा रस्त्यावर रात्रभर पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट
08 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात