E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
आंबेगाव, जुन्नर, हवेलीचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा
Samruddhi Dhayagude
02 Oct 2026
अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांची मागणी
मंचर, (वार्ताहर) : आंबेगाव, जुन्नर व हवेली तालुक्यांतील दुष्काळसदृश परिस्थितीची तातडीने पाहणी करून संबंधित तालुके व बाधित गावांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, अशी मागणी पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
आढळराव पाटील यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन दिले. खरीप हंगाम २०२६ मध्ये राज्यातील २६५ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुके म्हणून समावेश करण्यात आला आहे. मात्र, शिरूर लोकसभा मतदारसंघातील आंबेगाव, जुन्नर व हवेली तालुक्यांचा समावेश नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठारासह लोणी, धामणी, शिरदाळे, मांदळेवाडी, वडगावपीर, कुरवंडी, कोल्हारवाडी, थूगाव, भावडी, कारेगाव, पेठ व पारगाव तर्फे खेड परिसरात पावसातील खंडाचा खरीप पिकांवर परिणाम झाला आहे. जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील आणे, नळावणे, बेल्हे, राजुरी परिसरातही सोयाबीनसह अन्य पिकांना फटका बसला आहे. हवेली तालुक्यातील ग्रामीण भागातील पीकस्थिती, जलसाठे व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता यांचे गावनिहाय मूल्यांकन करावे. बाधित शेतकर्यांचे पंचनामे करून दुष्काळी सवलती व शासकीय मदत द्यावी, अशी मागणी आढळराव पाटील यांनी केली.
तालुक्याची सरासरी पर्जन्यमानाची आकडेवारी न पाहता गावनिहाय व महसूल मंडळनिहाय वस्तुस्थिती तपासावी. बाधित शेतकर्यांचे पंचनामे तातडीने करून आंबेगाव, जुन्नर व हवेलीचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा.
- शिवाजीराव आढळराव पाटील, अध्यक्ष पुणे म्हाडा.
Related
Articles
भारत-वेस्ट इंडिज टी-20 मालिकेला आजपासून सुरुवात
06 Oct 2026
मंगळवेढ्यातील २३ गावांना टँकरने पाणी पुरवठा
08 Oct 2026
साखरेचे दर कमी होणार?
03 Oct 2026
भाजपकडून कौस्तुभ गावडे शिक्षक मतदारसंघाच्या रिंगणात
04 Oct 2026
देशभरात बेधुंदशाही; जनतेचे ऐकणार कोण?
06 Oct 2026
चंद्रभागा वाळवंट स्वच्छता अभियानातून १८ टन कचरा संकलित
08 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान