E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
महिला शेतकर्यांना मिळणार दोन लाखांपर्यंतचे सुरक्षा कवच
Samruddhi Dhayagude
02 Oct 2026
महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीचे आवाहन
भीमाशंकर, (वार्ताहर) : राज्य शासनाच्या वतीने ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम २०२६’ जाहीर करण्यात आला असून, याअंतर्गत शेती व शेतीपूरक व्यवसायात मोलाचे योगदान देणार्या महिलांना आता अधिकृत ‘महिला शेतकरी प्रमाणपत्र’ दिले जाणार आहे. आंबेगाव तालुक्यातील सर्व पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी तात्काळ नोंदणी करावी, असे आवाहन पंचायत समिती सभापती कैलासबुवा काळे यांनी केले आहे. प्रत्यक्ष शेतीत काम करणार्या महिला, शेतमजूर, कृषी प्रक्रिया उद्योग, पशुपालन, तसेच कुक्कुटपालन यांसारख्या शेतीपूरक व्यवसायात कार्यरत असलेल्या सर्व महिलांना या अधिनियमाअंतर्गत वय वर्षे १८ पूर्ण असणार्यांना ’महिला शेतकरी’ म्हणून प्रमाणपत्र प्रदान केले जाणार आहे. या प्रमाणपत्राच्या आधारे महिला शेतकर्यांना कृषी विभागाच्या विविध योजना प्राधान्याने मिळणार आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, हे प्रमाणपत्र असलेल्या महिला अथवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्यास किंवा कायमचे अपंगत्व आल्यास, ’गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजने’अंतर्गत संबंधित कुटुंबाला दोन लाख रुपयांची आर्थिक मदत देय ठरणार आहे.
महिलांना हे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी ही संपूर्ण नोंदणी प्रक्रिया पूर्णपणे मोफत ठेवण्यात आली आहे. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याने आंबेगाव तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या घरातील व कुटुंबातील १८ वर्षांवरील सर्व पात्र महिलांची दिलेल्या अधिकृत लिंकवर जाऊन लवकरात लवकर नोंदणी पूर्ण करावी आणि ’महिला शेतकरी प्रमाणपत्र’ प्राप्त करून घ्यावे, असे आंबेगाव पंचायत समिती सभापती कैलासबुवा काळे यांनी सांगितले.
Related
Articles
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून मार्ग काढा
05 Oct 2026
डिझेल दरवाढीला बसणार लगाम
04 Oct 2026
एक हजार 493 शेतकर्यांचे पंचनामे पूर्ण
04 Oct 2026
भारत-वेस्ट इंडिज टी-20 मालिकेला आजपासून सुरुवात
06 Oct 2026
संभाजीनगर पदवीधरमधून सतीश चव्हाण यांना उमेदवारी
06 Oct 2026
चित्रपट निर्माते-दिग्दर्शक सिंगीथम राव यांचे निधन
05 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान