E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
महाराष्ट्रात यंदा सर्वांत कमी पावसाची नोंद
Samruddhi Dhayagude
02 Oct 2026
पुणे : यंदाच्या मान्सून हंगामात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. प्रारंभीच्या दीड महिन्यात राज्यातील अनेक भागात पावसाचा एक थेंबही पडला नव्हता. एक दशकानंतर राज्यात यंदा सर्वांत कमी पावसाची नोंद झाली आहे. पाऊस कमी झाल्याने रब्बी पेरणीवरही संकट उभे राहिले आहे. त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे.
राज्यात ३६ पैकी २० जिल्ह्यांमध्ये अपुर्या पावसाची म्हणजेच सरासरीपेक्षा २० ते ५९ टक्के कमी पावसाची नोंद झाली. मान्सून हंगामात अपुर्या पावसाचा सर्वाधिक फटका बसलेल्या जिल्ह्यांमध्ये सोलापूर ऊणे ५८ टक्के, बीड ५१ टक्के, हिंगोली ४९ टक्के, जालना ४८ टक्के, अहिल्यानगर ४६ टक्के, धाराशिव ४५ टक्के, परभणी आणि अमरावती जिल्ह्यात ऊणे ४० टक्के पाऊस पडला आहे. मान्सून हंगामात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा १९ टक्के कमी पावसाची नोंद झाली. यंदा कोकण व गोव्यात दीर्घकालीन सरासरीपेक्षा १४ टक्के कमी, मध्य महाराष्ट्रात ११ टक्के कमी, मराठवाड्यात ४० टक्के कमी, तर विदर्भात सरासरीपेक्षा २३ टक्के कमी पाऊस नोंदला गेला.
मान्सून हंगामातील पावसाची राष्ट्रीय सरासरी ८६८.६ मिलिमीटर आहे. यंदा देशात ७५९.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हा पाऊस २००१ पासूनचा चौथ्या क्रमांकाचा, तर १९०१ पासूनचा १३ व्या क्रमांकाचा तुटीचा पाऊस ठरला. यंदा वायव्य भारतात सरासरीच्या ९४.१ टक्के, मध्य भारतात ९७ टक्के, दक्षिण भारतात ७६ टक्के, तर पूर्व आणि ईशान्य भारतात सरासरीच्या ७४ टक्के पावसाची नोंद झाली. पूर्व आणि ईशान्य भारतातील हंगामी पाऊस १९०१ पासूनचा, तर दक्षिण भारतातील पाऊस २००१ पासूनचा नीचांकी पाऊस ठरला.यंदा १६ मे रोजी अंदमान-निकोबारमध्ये मान्सूनचे आगमन झाले होते. तर ४ जून रोजी देवभूमी केरळमध्ये मान्सून दाखल झाला होता. ९ जुलैपर्यंत संपूर्ण देश मान्सूनने व्यापला होता. १९ सप्टेंबरपासून राजस्तानातून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे.
देशात पडलेला पाऊस
महिना
पाऊस
जून
६५ टक्के
जुलै
१०१ टक्के
ऑगस्ट
८४ टक्के
सप्टेंबर
९२ टक्के
Related
Articles
सोमेश्वर कारखान्यावर सुनेत्रा पवार यांच्या पॅनलचे वर्चस्व
13 Oct 2026
भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी न्यूझीलंडच्या संघाची घोषणा
12 Oct 2026
दिल्लीतील सीमापुरी परिसरात बहुमजली इमारत कोसळली
08 Oct 2026
जीएसटी अधिकार्यांचे अटकेचे अधिकार रद्द
09 Oct 2026
वैभव की संजू; संघनिवडीचा पेच
09 Oct 2026
योगी आणि यादव यांची नुरा कुस्ती : ओवेसी
14 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात