E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
विकसित भारतासाठी नशामुक्त युवक घडविण्याचा संदेश
Samruddhi Dhayagude
02 Oct 2026
टिळक महाराष्ट्र विद्यापीठात नशामुक्त भारत मोहिमेअंतर्गत जनजागृती फेरी
पुणे : टिळक महाराष्ट्र विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो)च्या वतीने गुरुवारी ‘विकसित भारतासाठी नशामुक्त युवा’ या संकल्पनेवर जागृती फेरी काढण्यात आली. भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालयाच्या ‘नशामुक्त भारत अभियाना’ अंतर्गत ही फेरी आयोजित करण्यात आली.टिमविच्या प्रांगणातून फेरीला सुरुवात झाली. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र-टिळक महाराष्ट्र विद्यापीठ वसाहत, कटारिया हायस्कूलसमोरून मार्गक्रमण करीत फेरी पुन्हा विद्यापीठाच्या प्रांगणात आली. विद्यापीठाच्या कुलसचिव प्रा. डॉ. सुवर्णा साठे यांनी झेंडा दाखवून फेरीचा प्रारंभ केला.
या फेरीत हॉटेल व्यवस्थापन, समाजकार्य, शारीरिक उपचारशास्त्र, डिजिटल कला, जनसंपर्क व वृत्तपत्रविद्या, विधी आदी विभागांतील सुमारे २०० रासेयो स्वयंसेवक सहभागी झाले. ‘माझे आरोग्य, माझी शान’, ‘नको व्यसन, करू शिक्षण’ अशा घोषणांद्वारे युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्यात आली.कार्यक्रम अधिकारी डॉ. महेश रंधवे, डॉ. प्रकाश यादव, तेजश्री दौंडे, नीता कदम आणि कुणाल लांजेकर तसेच कार्यक्रम समन्वयक ओंकार केने यांनी फेरीत सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे समन्वयन डॉ. प्रकाश यादव यांनी ओंकार केने यांच्या मार्गदर्शनाखाली केले. या उपक्रमासाठी विद्यापीठातील सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचार्यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
Related
Articles
भटक्या श्वानांच्या वाढत्या संख्येने नागरिकांमध्ये भीती
07 Oct 2026
मुंबई- बंगळुरू वंदे भारत स्लीपर रेल्वे सोलापूर मार्गे धावणार
06 Oct 2026
दुष्काळाच्या पाहणीसाठी शनिवारी केंद्राचे पथक येणार
07 Oct 2026
वेस्ट इंडिजचा पाच गडी राखून विजय; होपचे शतक
04 Oct 2026
पृथ्वी शॉ महाराष्ट्राचा कर्णधार; रणजीत नेतृत्वाची धुरा
06 Oct 2026
जिल्ह्यात टंचाईची चाहूल १७५ गावांसाठी पाणी नियोजनाला वेग
03 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान