E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पिंपरीत व्हिसाची मुदत संपल्यानंतरही वास्तव्य
Samruddhi Dhayagude
02 Oct 2026
अफगाणी विद्यार्थी ताब्यात
पिंपरी : निवासी परवान्याची मुदत संपल्यानंतरही पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्याला दहशतवाद विरोधी शाखा (एटीबी) आणि परदेशी नागरिक नोंदणी विभाग (एफआरओ) यांनी ताब्यात घेतले.
बावधन येथे सोमवारी ही कारवाई करण्यात आली. संबंधित विद्यार्थ्याला ताब्यात घेऊन त्याला मायदेशी पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दान्यार हुसेन (वय २६, मूळ अफगाणिस्तान) असे ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो बावधन येथील पेबल्स अरवेनिया सोसायटी, सिद्धार्थनगर परिसरात राहात होता.
पोलिस आयुक्तांच्या आदेशा नुसार आयुक्तालयाच्या हद्दीत अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांचा शोध सुरू आहे. दहशतवाद विरोधी शाखेला मिळालेल्या माहितीनुसार, हुसेन हा बावधन परिसरात राहत असल्याचे समोर आले. त्यानुसार, दहशतवाद विरोधी शाखा आणि परदेशी नागरिक नोंदणी विभाग यांच्या पथकाने त्याच्या निवासस्थानी जाऊन पडताळणी केली.हुसेन हा शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयात एम.ए. (अर्थशास्त्र)च्या तृतीय वर्षात शिक्षण घेत होता. मात्र जानेवारी २०२६ पासून तो महाविद्यालयात गैरहजर असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.
त्याच्याकडील पासपोर्ट आणि विद्यार्थी व्हिसाची तपासणी केली असता पासपोर्टची मुदत २६ जून २०२७ पर्यंत होती. भारतात वास्तव्यासाठी असलेल्या त्याच्या निवासी परवान्याची मुदत ३१ जानेवारी २०२६ रोजी संपली होती. त्यानंतर मुदतवाढ न घेताच तो भारतात राहात असल्याचे स्पष्ट झाल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. बावधन पोलिस आणि परदेशी नागरिक नोंदणी विभागामार्फत (एफआरओ) त्याला अफगाणिस्तानला पाठविण्याची पुढील प्रक्रिया सुरू आहे.
पोलिसांचे आवाहन
परदेशी नागरिकांना घर, बंगला, सदनिका अथवा हॉटेलमध्ये वास्तव्यास ठेवणार्यांनी त्याबाबतचा ’सी-फॉर्म’ २४ तासांच्या आत परदेशी नागरिक नोंदणी विभागाकडे (एफआरओ) सादर करणे बंधनकारक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. परिसरात एखादा परदेशी नागरिक मुदत संपल्यानंतरही अनधिकृतपणे राहत असल्याचे निदर्शनास आल्यास परदेशी नागरिक नोंदणी विभाग (एफआरओ) किंवा दहशतवाद विरोधी शाखेला (एटीबी) तत्काळ माहिती देण्याचे आवाहन पिंपरी- चिंचवड पोलिसांनी केले आहे.
Related
Articles
‘आस्था’ महिलांसाठी हक्काचं घर
13 Oct 2026
श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेस सोन्याचे दोन तुळशी हार अर्पण
12 Oct 2026
पाकिस्तानात रेल्वेचे १४ डबे घसरून सहा जणांचा मृत्यू
14 Oct 2026
अभिषेकला रोखणे कठीण : स्प्रिंगर
13 Oct 2026
नोबेल न मिळाल्याने ट्रम्प यांचा थयथयाट नॉर्वेला धमकावले
11 Oct 2026
रविवार पेठेतील सव्वादोन कोटींच्या सोन्याच्या चोरीचा छडा
14 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात