E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता महापालिकेकडून नियोजनासाठी हालचाली
Samruddhi Dhayagude
02 Oct 2026
पुणे : शहरात सध्या पाणीकपात लागू झालेली नसली, तरी आगामी काळातील संभाव्य टंचाई लक्षात घेऊन महापालिकेने पाण्याच्या नियोजनासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. शहराची वाढती गरज, धरणांतील उपलब्ध साठा आणि पावसातील संभाव्य अनिश्चितता विचारात घेऊन आवश्यक पाणी राखून ठेवावे, अशी विनंती महापालिकेने पाटबंधारे विभागाला केली आहे. याबाबत ३० सप्टेंबर रोजी पत्र पाठविण्यात आले आहे.
राज्य सरकारकडून शहरी भागांत दहा टक्के पाणीकपातीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या पाणीपुरवठ्याबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र, शासनाचा अधिकृत आदेश अद्याप मिळालेला नसल्याने पुण्यात कपात लागू केलेली नाही, असे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकुमार जगताप यांनी स्पष्ट केले होते. शहराचा पुरवठा नियमित वेळापत्रकानुसार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले होते.
दरम्यान, महापालिकेच्या नव्या पत्रातून पुढील काळातील पाणी उपलब्धतेचा मुद्दा समोर आला आहे. पुण्यासाठी २०२६-२७ या वर्षात २१.३४ टीएमसी पाण्याची आवश्यकता असल्याचे महापालिकेने नमूद केले आहे. त्यानुसार पाण्याचे अंदाजपत्रक सादर केले असून, पाटबंधारे विभागाचे या वर्षाचे अंदाजपत्रक अद्याप प्राप्त झाले नसल्याचे पत्रात म्हटले आहे. महापालिका हद्दीत २०१७ मध्ये ११ आणि २०२१ मध्ये २३ गावांचा समावेश झाला. या गावांना महापालिकेमार्फत पाणीपुरवठा केला जात आहे. नव्याने समाविष्ट गावे आणि वाढती लोकसंख्या यामुळे पाण्याची मागणी वाढत असल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे शहराच्या गरजेनुसार पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन कळविण्याची मागणी करण्यात आली आहे.
खडकवासला धरणसाखळीतील मुठा उजव्या कालव्यातून रब्बी हंगामासाठी आवर्तन सुरू करण्यात आल्याचाही पत्रात उल्लेख आहे. कालव्याचे आवर्तन, शहरासाठी उपलब्ध पाणी आणि इतर पाणीवापराच्या गरजा यांचा समन्वय साधून नियोजन करावे, अशी महापालिकेची भूमिका आहे. एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे पावसात अनिश्चितता किंवा घट होण्याची शक्यता पत्रात व्यक्त करण्यात आली आहे. त्याचा धरणांतील साठ्यावर परिणाम होऊ शकतो, म्हणून भविष्यातील टंचाई लक्षात घेऊन पुण्यासाठी आवश्यक पाणी आरक्षित ठेवण्याची विनंती करण्यात आली आहे.
सध्या नियमित पुरवठा सुरू आहे. पाठबंधारे विभागाला पाठवलेले पत्र पाणीकपातीचा आदेश नसून पाणी नियोजनाची मागणी आहे. शासनाचा आदेश मिळाल्यानंतर आयुक्त आणि पक्षनेत्यांच्या बैठकीत कपातीबाबत निर्णय घेतला जाईल.
- नंदकिशोर जगताप, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख, पुणे महापालिका
Related
Articles
पुणे बुक फेअरचे प्रसेनजीत फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
08 Oct 2026
किरकोळ महागाई दर ५.५४ टक्क्यांवर
13 Oct 2026
मंगळवेढ्यातील २३ गावांना टँकरने पाणी पुरवठा
08 Oct 2026
निर्यातप्रक्रिया झाली सोपी
08 Oct 2026
वाचक लिहितात
12 Oct 2026
शिक्षेच्या नावाखाली मुलाला स्वच्छतागृहात कोंडले
14 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात