महिला स्क्वॅश संघाला कांस्य   

पुरुष संघ उपांत्य फेरीत मलेशियाशी भिडणार

आयची-नागोया : आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला स्क्वॅश सांघिक प्रकारात भारताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. उपांत्य फेरीत हाँगकाँगने भारताचा २-१ असा पराभव केला. दरम्यान, भारतीय पुरुष संघ उपांत्य फेरीत मलेशियाविरुद्ध खेळणार आहे.
 
अनाहत सिंहने चान सिन युकविरुद्ध पहिले दोन गेम ११-९, ११-८ असे जिंकत भारताला आघाडी मिळवून दिली. मात्र, चान सिनने पुनरागमन करत पुढील तीन गेम ११-६, १३-११, १२-१० असे जिंकून हाँगकाँगला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर तन्वी खन्नाने ली का यीवर ४-११, १३-११, ११-९, १३-११ अशी मात करत भारताला १-१ अशी बरोबरी साधून दिली. मात्र, निर्णायक लढतीत जोशना चिनप्पाला हो त्जे लोककडून ४-११, ७-११, ९-११ असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे हाँगकाँगने अंतिम फेरी गाठली. आशियाई स्पर्धेतील स्क्वॅशमधील भारताचे हे चौथे पदक आहे. 

Related Articles