E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
कंपाउंड तिरंदाजीत गणेशला कांस्य
Samruddhi Dhayagude
02 Oct 2026
नागोया : भारतीय कंपाउंड तिरंदाज गणेश मणि रत्नम थिरुमुरु याने आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या वैयक्तिक प्रकारात कांस्यपदक जिंकले. उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाच्या किम जोंगहोविरुद्ध १४४-१४८ असा पराभव झाल्यानंतर गणेशने कांस्यपदकाच्या लढतीत व्हिएतनामच्या कोंग डुक डांगचा १४९-१४४ असा पराभव केला.
२० वर्षीय गणेशने कांस्यपदकाच्या लढतीत १५ पैकी १४ बाण १० गुणांच्या लक्ष्यावर साधले. उपांत्यपूर्व फेरीत त्याने चायनीज तैपेईच्या चिह लुन चेनवर १४८-१३८ अशी मात केली होती. दरम्यान, महिला कंपाउंड प्रकारात चिकिथा तनीपार्थीचे पदक थोडक्यात हुकले. महिला सांघिक आणि मिश्र सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकल्यानंतर वैयक्तिक प्रकारातही पदकाची अपेक्षा होती. मात्र, उपांत्यपूर्व फेरीत इंडोनेशियाच्या नुरिसा दियान अशरीफाहने चिकिथाचा १४४-१४३ असा पराभव केला. निर्णायक पाचव्या सेटच्या पहिल्याच बाणावर चिकिथाने आठ गुण मिळवल्याने तिला एका गुणाने पराभव पत्करावा लागला.
Related
Articles
शिक्षणाचा उद्देश केवळ पदवी नव्हे, तर चांगला नागरिक घडविणे
03 Oct 2026
यूपीआयच्या अतिरिक्त शुल्काची उद्योगनगरीतील लघुउद्योगांना धास्ती
04 Oct 2026
खंबाटकी घाटात वाहतूक कोंडी सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांची गर्दी
03 Oct 2026
नायजेरियात चार वाहनांची धडक; २० जणांचा मृत्यू
05 Oct 2026
पीएमआरडीएबाबत मावळ तालुक्याच्या सात गावातील शेतकर्यांमध्ये असंतोष
04 Oct 2026
राज्यातून मान्सूनची लवकरच माघार
04 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान