E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय
Samruddhi Dhayagude
02 Oct 2026
सुवर्णपदकासाठी पाकिस्तानशी लढत
निशिन : भारतीय पुरुष क्रिकेट संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात श्रीलंकेचा १२४ धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. भारताने २० षटकांत ७ बाद १६९ धावा केल्यानंतर श्रीलंकेचा डाव ९.५ षटकांत अवघ्या ४५ धावांत गुंडाळला. आता ३ ऑक्टोबरला सुवर्णपदकासाठी भारताची लढत साहिबजादा फरहानच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानशी होणार आहे.
श्रीलंकेविरुद्धचा १२४ धावांचा विजय हा भारताचा या संघाविरुद्धचा टी-२० क्रिकेटमधील सर्वांत मोठा विजय ठरला. यापूर्वी भारताने २०१७ मध्ये कटक येथे श्रीलंकेचा ९३ धावांनी पराभव केला होता. २०२३च्या हांगझोऊ आशियाईमध्ये ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली भारताने सुवर्णपदक जिंकले होते. आता पुरुष संघ सलग दुसर्या सुवर्णपदकासाठी मैदानात उतरणार आहे. भारतीय महिला संघानेही सलग दुसर्यांदा सुवर्णपदक पटकावले आहे.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणार्या भारताने २० षटकांत ७ बाद १६९ धावा केल्या. ईशान किशन आणि वैभव सूर्यवंशी यांनी भारताच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. वैभवने २१ चेंडूंत सहा चौकार व दोन षटकारांसह ३८ धावा केल्या. ईशानने ४६ चेंडूंत चार चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने नाबाद ८० धावांची खेळी केली. कर्णधार श्रेयस अय्यरने १३ धावा केल्या. श्रीलंकेकडून थारिंदु रत्नायके आणि कर्णधार सहान अराचिगे यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
सहा फलंदाज शून्यावर बाद
१७० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ सुरुवातीपासूनच अडचणीत आला. सहा फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. नुवानिदु फर्नांडोने सर्वाधिक १५ धावा केल्या, तर कर्णधार सहान अराचिगेने ९ धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल आणि अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. वॉशिंग्टन सुंदरने एक बळी मिळवला. श्रीलंकेचे तीन फलंदाज धावबाद झाले. त्यामुळे त्यांचा डाव ९.५ षटकांत ४५ धावांत संपुष्टात आला.
Related
Articles
सर्वोच्च न्यायालयावर ‘इंडिया’ आघाडीचा मोर्चा
13 Oct 2026
ब्रिटिशकालीन पूल होणार इतिहासजमा
08 Oct 2026
आंदोलनग्रस्त सरकारचे दुष्काळग्रस्तांकडे दुर्लक्ष !
13 Oct 2026
तिसर्या सामन्यातही गोलंदाजांची कसोटी
11 Oct 2026
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
09 Oct 2026
कुशल तंत्रज्ञांवर निर्बंध (अग्रलेख)
13 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात