E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
लाइफस्टाइल
अरसिक अबोल नवरा
Samruddhi Dhayagude
02 Oct 2026
थकलेली माणसे : विजय तरवडे
एका समवयस्क मित्राची आणि त्याच्या बायकोची हकीकत सांगतो. दोघांची वये सत्तरीपार. एकुलती एक मुलगी लग्न करून परगावी गेलेली. घरात दोघे एकटेच. रक्तदाब वगळता आरोग्याच्या इतर कोणत्याही मोठ्या तक्रारी नाहीत. काही दिवसांपूर्वी त्याने गावातले दोन खोल्यांचे घर विकून दूरच्या उपनगरात मिश्रधर्मीय वस्तीत सदनिका घेतली. हेतू हा की, गावातल्या गोंगाटापासून सुटका व्हावी.
अनेकदा त्याने घरी बोलावले होते. वेळात वेळ काढून त्याच्या घरी जाऊन आलो. खूप दिवसांनी भेट झाल्यामुळे दोघांशी भरपूर गप्पा झाल्या. मित्राची बायको हौशी आहे. उत्साही आहे. हसतमुख आणि प्रेमळ स्वभाव असल्याने भरपूर मैत्रिणी आणि व्हॉट्सअॅप ग्रुप जोडले आहेत. लहानमोठ्या सहलींना जाते. तिथं छोटीमोठी खरेदी करते. फोटो काढते. प्रसारित करते. दिवस कधी सुरू होतो आणि कधी संपतो हे तिला समजत नाही. कितीकदा कुठल्या कुठल्या ग्रुपच्या कार्यक्रमात किंवा सहभोजनात ती अडकून पडते. नवरा घरी एकटाच चार घास खाऊन घेतो.
त्याला करमतं का? त्याने हसून होकार दिला. ती म्हणाली, त्यांना गर्दीत करमत नाही. प्रवासाचा देखील कंटाळा येतो. नोकरीत असताना दर दोन वर्षांनी पर्यटनासाठी पैसे मिळत. त्यातून मला माहेरी पाठवत. स्वतः अगदी नाइलाज झाला तरच प्रवासाला निघत. गावातल्या गावात सिनेमाला, नाटकाला आम्ही बरोबर जातो. पूर्वी लग्नाला देखील जायचो; पण हल्ली गावाबाहेर ‘गार्डन’ नावाच्या मैदानात डीजेडॉल्बीच्या दणदणाटात लग्नं होतात. त्यांना येणं टाळतात. आलेच तर आवाजापासून दूर कोपरा पकडून शांतपणे मोबाईल बघत बसतात. मी एकटीच जाऊन नाचगाण्यांचा आनंद घेते आणि छान बुफेत मांडलेले जेवण जेवून येते. हे घरी मी केलेल्या पोळीभाजीला राजी असतात.
घरी असतोस, तर पुस्तकं वगैरे वाचतोस काय? मी त्याला विचारलं. कधी कधी वाचतो. पण खरं तर त्यातही मन रमत नाही. जुने लेखक सगळे वाचून झालेत. पुन्हा वाचायचा कंटाळा येतो. नव्या लेखकांचं भावविश्व, त्यांचे प्रश्न इतके अनोळखी असतात की दोनचार पानांपुढे वाचवत नाही.मला सिरियल्स बघायला आवडतात. यांना ते देखील आवडत नाही, ती करवादली, पण लगेच काळजीच्या स्वरात बोलली, सतत एकलकोंड्यासारखे वावरतात. कमी बोलतात. भीती वाटते. त्यांना जरा फिरायला घेऊन जा.
जेवणं झाली. जेवणानंतर तिने टीव्ही लावला. तिला कुठलीशी मालिका बघायची होती. आम्ही दोघे आतल्या खोलीत गेलो आणि बेडवर पाय पसरून भिंतीला टेकून निवांत बसलो. मग मी त्याला थेटच विचारलं, वहिनी म्हणते ते सगळं मला खरं वाटलं आणि असेलच. तुला मी इतकी वर्षे ओळखतो. पण आता हे एकलकोंडेपण वाढलंय का तुझं? काही विशेष कारण आहे का? सांगता येण्याजोगं आहे?
लपवण्यासारखं काहीच नाही. पूर्वीपासूनच मला गर्दीत आणि आवाजात कानकोंड्यासारखं होतं हे तुला ठाऊकच आहे. हल्ली गावात सततच्या उत्सव आणि डीजेडॉल्बीपायी जीव हैराण झाला होता. म्हणून इथं राहायला आलो. इथं शांतता आहे. पल्याच वयाची जोडपी असल्याने गोंगाट नाहीच. सकाळी आम्ही दोघे बागेत जातो. ही लाफिंग क्लबवाल्यांबरोबर अर्धापाऊण तास रमते. त्या काळात मी जॉगिंग ट्रकवर चालतो. अनेकजण कानात हेडफोन लावून चालत किंवा धावत असतात.
तू एकटा एकटा अबोल राहतोस, वहिनीला चिंता वाटते. तिला म्हणावं, माझी चिंता करू नकोस. तुला सगळंच सांगतो, रिटायरमेंटनंतर मी एक कथा वाचलेली. त्यात वर्णन होतं की आपल्या विश्वाप्रमाणे इतरही सहा समांतर विश्वे आहेत. त्यात आपल्यासारखीच माणसं आहेत. आपण देखील आहोत. तिथे याच घटना थोड्याफार फरकाने घडत असतात. खरोखरच अशी समांतर विश्वे असतील किंवा नसतील; पण मला ती आवडली.
दुसर्या विश्वात एकदा मी शाळेतला मुलगा आहे अशी कल्पना करून गेलो आहे. एसएससीच्या गणिताच्या पेपरला बसऐवजी मित्राबरोबर सायकलवर डबलसीट जाताना धडपडलो होतो. हात खरचटला आणि लचकला. पेपरला वेळेवर पोचलो होतो. पण हात दुखत असल्याने सगळी गणिते सोडवता आली नाहीत. काठावर पास झालो. दुसर्या विश्वात गणिताच्या पेपरला जाताना मी मित्राबरोबर सायकलवर डबलसीट न जाता बसने गेलो आणि पेपर नीट लिहून शंभरपैकी शंभर मार्क मिळवले.
अशा अनेक कल्पना मी रोज करत असतो, मनाने समांतर विश्वात जाऊन माझ्या चुका दुरुस्त करून निर्णय बदलून काय होतं ते बघत असतो. मस्त टाईमपास होतो. त्याचं म्हणणं मला जगावेगळं वाटलं. पटलं देखील. बरोबर असो की नसो.
Related
Articles
युक्रेनच्या ऊर्जा प्रकल्पांवर रशियाकडून हल्ले सुरूच
13 Oct 2026
भारत दौर्यासाठी झिम्बाब्वेचे नेतृत्व जोसेफिन नकोमोकडे
11 Oct 2026
किल्ला चढताना पर्यटकाचा मृत्यू
12 Oct 2026
सौरव दास, आशुतोष रांका पुन्हा पोलिसांच्या ताब्यात
14 Oct 2026
पावसाच्या लहरीपणामुळे भविष्यात पाणीटंचाईची समस्या उद्भवण्याची शक्यता
12 Oct 2026
वाचक लिहितात
12 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात