E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अर्थ
डाळींच्या उत्पादनात ६० टक्क्यांनी घट; दरात मोठी वाढ
Samruddhi Dhayagude
01 Oct 2026
संजय ऐलवाड
पुणे : कमी पावसाचा सर्वांत मोठा फटका खरीप हंगामातील पिकांना बसला आहे. विशेषत: राज्यासह परराज्यातील विविध प्रकारच्या डाळींचे पीक पाण्याअभावी वाया गेले असून, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा डाळींच्या उत्पादनात तब्बल ६० टक्क्यांपेक्षा अधिकची घट होणार असल्याचा अंदाज आहे. आतापासूनच दुष्काळाच्या झळा जाणवण्यास सुरुवात झाली असून, घाऊक बाजारात डाळींच्या किलोच्या दरात १५ ते २० रुपयांनी वाढ झाली आहे.
महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि राजस्तानमध्ये सर्वाधिक डाळींचे उत्पादन घेतले जाते. मात्र, या राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आतापासूनच डाळींची आवक घटण्यास सुरुवात झाली आहे. मार्केटयार्डातील भुसार विभागात एकूण मागणीच्या ५० टक्के डाळ मराठवाड्यातून येते. राजस्तानातून ८० टक्के मूगडाळ तर आंध्र प्रदेशातून ७५ टक्के उडीद डाळ येते. मात्र, या राज्यात दुष्काळ आहे. खरीप हंगामाचा कालावधी संपत आला आहे. त्यामुळे आता पाऊस पडला, तरी डाळींच्या उत्पादनात वाढ होणार नाही. केवळ पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटू शकतो. त्यामुळे पुढच्या हंगामापर्यंत विविध प्रकारच्या डाळींचे दर उचांकी असणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना डाळींची खरेदी करताना विचार करावा लागणार आहे.
सध्या शिल्लक साठ्यातून डाळींची बाजारात आवक होत आहे. मात्र, साठ्याला मर्यादा असल्यामुळे मागील ८ ते १० दिवसांत मार्केटयार्डातील भुसार बाजारात ३० ते ४० टक्क्यांनी डाळींची आवक घटली आहे. येत्या काळात एकीकडे आवक घटत जाणार आहे, तर दुसरीकडे त्या पटीत घाऊक आणि किरकोळ बाजारात दर वाढत जाणार असल्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. खरीप हंगामात तूर, मुग, उडीद, हरभरा, मसूर आणि मटकी आदी डाळींची पिके घेतली जातात. मात्र, यंदा पावसाअभावी बहुतांश डाळी उत्पादक राज्यांतील ही पिके वाळली आहेत.
ज्या भागात पुरेसा पाऊस झाला आहे त्या भागात काही प्रमाणात उत्पादन होईल. मात्र, त्याचे प्रमाण अत्यल्प असणार आहे. त्यामुळे येत्या काळात डाळींची खरेदी करताना सर्वसामान्यांच्या खिशावर ताण येणार आहे.
मार्केटयार्डातील भुसार बाजारात दररोज प्रत्येक डाळीची सुमारे २० ते २५ टनाची आवक होते. मात्र, या आठवड्यात त्यात लक्षणीय घट झाली आहे. सध्या १० ते १५ टनाची आवक होत आहे. कालावधी जसा पुढे जाईल, त्या तुलनेत आवक घटणार आहे. साधारणतः मराठवाडा, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि राजस्तान येथून डाळींची आवक होत असते.
मात्र, यंदा राज्यासह परराज्यातही डाळींचा तुटवडा जाणवणार आहे. पावसाअभावी मागील वर्षीच्या तुलनेत डाळींचे ३० ते ४० टक्केच उत्पादन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डाळींचे दर अधिकच राहणार असल्याचा अंदाज व्यापारी वर्तवित आहेत.
महागाईत आणखी भर पडणार
आताच विविध प्रकारच्या डाळींची आवक घटत चालली आहे. उत्पादन अत्यल्प असल्यामुळे येत्या काळात आवक आणखी घटणार आहे. त्यामुळे दरातही वाढ होत जाईल. विशेष म्हणजे, बहुतांश प्रकारच्या डाळींचे दर मोठ्या प्रमाणात वाढतील, असा अंदाज आहे. आता पाऊस पडला, तरी त्याचा फार उपयोग होणार नाही.
- नितीन नहार, डाळींचे व्यापारी, मार्केटयार्ड.
घाऊक बाजारातील डाळींचे किलोचे दर
डाळ
दर
तूर
१२५ ते १३८ रुपये
उडीद
११५ ते १३० रुपये
मटकी डाळ
१०५ ते ११० रुपये
मूगडाळ
१०० ते ११० रुपये
हरभरा डाळ
८६ ते ९० रुपये
मसूर
७७ ते ८० रुपये
Related
Articles
वाचक लिहितात
09 Oct 2026
‘एक तास गावासाठी’ स्वच्छतेच्या कार्यात राबले हजारो हात..!
03 Oct 2026
मुळा-मुठा प्रदूषणमुक्तीसाठी 1 हजार 438 कोटींचा आराखडा
07 Oct 2026
माझे एक्स हँडलवर बंदीचे आश्चर्य नाही
03 Oct 2026
विधी प्रवेश अर्ज सादर करण्यापूर्वी कागदपत्रांची पडताळणी आवश्यक
09 Oct 2026
कमी पावसामुळे बटाटा उत्पादनात घट
03 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान