वैमानिकाला भोसकून विमान पाडण्याचा प्रयत्न   

इस्रायलचे सर्व प्रवाशी सुखरुप; विमान अखेर सौदी अरेबियात उतरले

तेलअविव : दुबईहून संयुक्त अरब अमिरात आणि नंतर इस्रायलकडे प्रवास करणार्‍या एका विमानाचे अपहरण झाल्याचा संदेश वैमानिकाने बुधवारी पाठवल्यामुळे एकच गोंधळ उडाला. आणीबाणीची परिस्थिती निमार्र्ण झाल्याचे लक्षात येताच इस्रायलने दोन लढाऊ विमाने सुरक्षेसाठी पाठवली होती. अखेर दोन वैमानिकांच्या वादातून हा प्रकार घडल्याचे उघड झाले. अखेर विमान सौदी अरेबियाकडे वळवून ते उतरविण्यात आले. त्यामुळे १७४ प्रवाशांसह सुरक्षा यंत्रणांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, दोन वैमानिकांमध्ये कोणत्या विषयावरुन भांडण झाले होते? याचा तपशील मिळालेला नाही. दरम्यान, एका वैमानिकाने दुसर्‍या वैमानिकाला चाकूने भोसकले होते, हा प्रकार विमान पाडण्याचा होता, असे उघड होत आहे.  या बाबीला इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी देखील दुजोरा दिला.
 
दरम्यान. या हल्ल्यात जखमी झालेले वैमानिक हे भारतीय नागरिक असून त्यांचे नाव स्मित मच्छार असल्याची माहिती समोर आली आहे. विमान दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जात होते. उड्डाणादरम्यान ही घटना घडल्यानंतर विमान ताबूककडे वळवण्यात आले. विमानाचे सुरक्षित लँडिंग झाल्यानंतर मच्छार आणि सह-वैमानिकाला तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मच्छार यांच्या प्रकृतीबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
 
ताबूक विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार बुधवारी सकाळी ८ वाजून ४४ मिनिटांनी विमानाने धोक्याचा संदेश पाठवला होता. त्यानंतर सुमारे एका तासाने विमान विमानतळावर  उतरले. ‘फ्लाईट ट्रॅकिंग’ आकडेवारीनुसार, हे विमान अवघ्या ३७ सेकंदांत तब्बल १ हजार ३०० फुटांपेक्षा जास्त खाली आले. त्यानंतर विमानाने अनधिकृत हस्तक्षेपाचा ट्रान्सपॉन्डर कोड सक्रिय केला.

प्रवाशांचा हस्तक्षेप; मोठी दुर्घटना टळली

इस्रायलमधील वृत्त संकेतस्थळ वायनेट न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, सह-वैमानिकाने फ्लायदुबईचे विमान कोसळवण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप काही प्रवाशांनी केला आहे. एका प्रवाशाची चित्रफित समोर आली आहे. 

फ्लायदुबई इस्रायली पर्यटकांचे आवडते

फ्लायदुबई ही एमिरेट्स एअरलाइन्सची कमी खर्चाची सह विमान कंपनी आहे. २०२० मध्ये संयुक्त अरब अमिरात आणि इस्रायल यांच्यात संबंध सुधारल्यानंतर, संयुक्त अरब अमिरात हे इस्रायली पर्यटकांसाठी एक लोकप्रिय सुट्टीचे ठिकाण बनले आहे. फ्लाइट रडारनुसार, ही घटना विमान उड्डाणानंतर सुमारे अडीच तासांनी घडली. फ्लायदुबईने नंतर पुष्टी केली की, बेन गुरियनला जाणार्‍या फ्लाइट एफझेड- १०७३ मध्ये अनावश्यक घटना घडली आणि बुधवारी ते तबुकमध्ये सुरक्षितपणे उतरले. आमचे पथक संबंधित अधिकार्‍यांसोबत मिळून काम करत आहेत, असे विमान कंपनीने म्हटले. अधिक खात्रीशीर तपशील उपलब्ध झाल्यावर पुढील माहिती दिली जाईल.
 

Related Articles