ओटावा : कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी नोबेल पुरस्काराच्या शर्यतीत आहेत. याद्वारे ते अमेरिकेच्या अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात एक प्रकारे उभे ठाकले असल्याचे मानले जात आहे. शांततेचा नोबेल पुरस्कार प्राप्त व्हावा, यासाठी त्यांनी आतापासून तयारी सुरू केली आहे. यासाठी जागतिक पातळीवर छबी निर्माण करण्याचा खटाटोप सुरू केला आहे. शांततेचे नोबेल मिळावे यासाठी प्रथम टाईम मॅगझिनवर झर्ळकण्याचा त्यांचा खटाटोप आहे. त्यासाठी त्यांनी प्रयत्नही सुरू केल्याचे मानले जात आहे.
Fans
Followers