E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडीचा मंगळवारी मोर्चा
Samruddhi Dhayagude
01 Oct 2026
नवी दिल्ली : मतदारांची विशेष तीव्र पडताळणी (एसआयआर) मोहिमेतील अनियमितता आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निषेधार्थ ‘इंडिया’ आघाडीचे सर्व खासदार ६ ऑक्टोबर रोजी (मंगळवारी) निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढणार आहेत. यासोबतच, २ ते ८ ऑक्टोबर या कालावधीत देशभर स्वयंसेवी संस्था आणि तरुणांसोबत ‘लोकशाही वाचवा’ मोर्चे काढले जातील आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली जातील, अशी माहिती काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बुधवारी दिली.
इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची काल राजधानी दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत लोकशाही वाचविण्यासाठी आणि राज्यघटनेच्या रक्षणासाठी विरोधकांनी एकजुटीची वज्रमूठ बांधण्याचा निर्धार केला.
या बैठकीला काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, जयराम रमेश, के. सी. वेणुगोपाल, तृणमूलच्या ममता बॅनर्जी, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, आरजेडीचे तेजस्वी यादव, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) च्या खासदार सुप्रिया सुळे यांसह जम्मू-काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी, झारखंड मुक्ती मोर्चा, सीपीआय-एमएल, आययूएमएल, केरळ काँग्रेस (एम), केरळ काँग्रेस (जेकब) आणि ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचे नेते उपस्थित होते.
या बैठकीनंतर आघाडीच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत निर्णयाची माहिती दिली.
विरोधी पक्षांचे सर्व खासदार ६ ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढतील, असे खर्गे यांनी सांगितले. यासोबतच, देशभरात जिल्हापातळीवर २ ते ८ ऑक्टोबर दरम्यान विरोधी पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते स्वयंसेवी संस्था आणि तरुणांसोबत ‘लोकशाही वाचवा’ मोर्चे काढतील आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करतील, असेही ते म्हणाले. त्यानंतर, विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन निवेदन सादर करेल, असे सांगितले. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राऐवजी (इव्हीएम) मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची मागणी तीव्र केली जाईल. तसेच, त्याची तारीख आणि ठिकाण नंतर ठरवले जाईल, असेही खर्गे यांनी स्पष्ट केले. या बैठकीला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि झारखंडचे मुख्यमंत्री व जेएमएम प्रमुख हेमंत सोरेन ऑनलाईन सहभागी झाले होते.
Related
Articles
कुमकुमला महिला वैयक्तिक रिकर्वमध्ये विजेतेपद
04 Oct 2026
आशियाई क्रीडा स्पर्धेचा शानदार समारोप
05 Oct 2026
जिल्हा स्तरावर ५०० विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह
09 Oct 2026
आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धा
09 Oct 2026
भारतीय मसाल्यावरील आयात शुल्कात कपातीची अमेरिकन व्यापार्यांना आशा
08 Oct 2026
भारताच्या ‘बिग कॅट अलायन्स’मध्ये घाना
09 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान