पंचवीस लाखांच्या ई सिगारेट जप्त   

नवी दिल्ली : मध्य दिल्लीत २५ लाख रुपयांच्या ई सिगारेट जप्त करण्यात आल्या. अशा सिगारेटचा वापरावर बंदी असताना त्यांचा साठा करुन ठेवल्याप्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली. शाहबाज (वय २८), असे आरोपीचे नाव आहे. मध्य दिल्लीतील अजमेर गेट परिसरातील त्याच्या घरात मंगळवारी पोलिसांनी छापा घातला होता. तेथे तीन पांंढर्‍या प्लास्टिक पिशव्या पोलिसांना सापडल्या. त्यात १ हजार २०० ई सिगारेट ठेवल्याचे आढळले.  या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे या सिगारेट त्याने कोठून आणल्या ? याचा तपास आता पोलिसांनी सुरु केला आहे. 
 

Related Articles