हिमाचल प्रदेशात पावसाळ्यात १५० हून अधिक जणांचा बळी   

सिमला : हिमाचल प्रदेशात जूनपासून २९ सप्टेंबरपर्यंत पावसाशी संबंधित घटनांमध्ये १५२ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याचे अंदाजे ३ हजार २२० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती अधिकार्‍यांनी बुधवारी दिली. पावसाळ्यात राज्यात ७३३.४ मिमी सरासरीच्या  तुलनेत ६५२.६ मिमी पाऊस झाल. एकंदरीत ११ टक्के कमी पाऊस पडला आहे. दरडी कोसळणे आणि पुरामुळे १९ जणांचा मृत्यू झाला, तर ढगफुटीच्या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. उंचावरून पडून ६२ जणांचा मृत्यू झाला, १७ जण बुडाले, १६ जणांचा सर्पदंशाने मृत्यू झाला, दहा जण विजेचा धक्का लागल्याने मरण पावले आणि २८ जणांचा मृत्यू इतर कारणांमुळे झाला, असे अधिकार्‍यांनी सांगितले. 

Related Articles