नवी दिल्ली : दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालिद आणि शरजील इमाम यांचा जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावला. न्यायमूर्ती प्रतिभा एम. सिंग आणि न्यायमूर्ती दिनेश भट्ट यांच्या पीठासमोर हा अर्ज सुनावणीसाठी होता. न्यायालयीन शिस्तीचे पालन करणे बंधनकारक असल्याचे नमूद करताना सर्वोच्च न्यायालयाच्या ५ जानेवारीच्या आदेशात आपण बदल करू शकत नाहीत, असे सांगत हा अर्ज फेटाळून लावला. साक्षीदारांची साक्ष पूर्ण झाल्यानंतर किंवा एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर जामिनासाठी अर्ज करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते. आम्ही जामीन मंजूर केला तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात बदल केल्यासारखे होईल, असे निरीक्षणही नोंदविले.
Fans
Followers