E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
गव्हाच्या किमान आधार किंमतीत वाढ
Samruddhi Dhayagude
01 Oct 2026
नवी दिल्ली : केंद्र सरकारने गव्हाच्या किमान आधार किंमतीत (एमएसपी) प्रति क्विंटल २५ रुपयांची वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे २०२७-२८ च्या रब्बी हंगामासाठी हा भाव २,६१० रुपये प्रति क्विंटल झाला आहे, असे माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी सांगितले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर वैष्णव यांनी ही माहिती दिली.
यापूर्वी, २०२६-२७ या वर्षासाठी (एप्रिल-मार्च) गव्हाचा एमएसपी २,५८५ रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आला होता. या बैठकीत गव्हासह इतर पाच रब्बी पिकांच्या किमान आधार किमतीबाबतचा कृषी मंत्रालयाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला, असे वैष्णव यांनी यावेळी सांगितले.
गव्हाचा उत्पादन खर्च सुमारे १,२६४ रुपये प्रति क्विंटल असून, सरकारने २०२७-२८ साठी २,६१० रुपये प्रति क्विंटल दर निश्चित केला आहे, असेही ते म्हणाले.केंद्र सरकारने गव्हासह बार्ली (जव), हरभरा, मोहरी, करडई आणि मसूर यांच्या किमान आधार किमतीत वाढ केली आहे.
बार्लीची (जव) किमान आधार किंमत प्रति क्विंटल २,२८६ रुपये करण्यात आली आहे. याआधी, २, १५० रुपये इतकी होती. याचाच अर्थ ८३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. हरभर्याचा किमान आधार भाव ८३ रुपयांनी वाढवून ५,८७५ रुपयांवरुन ५,९५८ रुपये प्रति क्विंटल करण्यात आला आहे. मसूरच्या किमान आधार किमतीत प्रति क्विंटलमागे ३९० रुपयांची वाढ झाली असून, हा दर ७,३९० रुपये करण्यात आला आहे.
मोहरीच्या किमान आधार किंमतीत ४१३ रुपयांची वाढ झाली असून ती ६,२०० रुपयांवरून ६,६१३ रुपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे.
करडईच्या दरात ६७५ रुपयांची वाढ करून ६,५४० रुपयांवरून ७,२१५ रुपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे.
Related
Articles
उसाला योग्य दर मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही
14 Oct 2026
श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेस सोन्याचे दोन तुळशी हार अर्पण
12 Oct 2026
दोन कोटींचे दागिने लुटणार्या टोळीला अटक
11 Oct 2026
ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचे निधन
13 Oct 2026
देशात अराजकता पसरवण्याचे आंतरराष्ट्रीय कारस्थान
14 Oct 2026
भारतातील भूजलात सतत घट
13 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात