E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
आमदाराच्या धमकीला आयुक्तांकडून केराची टोपली
Wrutuja pandharpure
01 Oct 2026
दबावाला बळी न पडता पारदर्शक कामांना प्राधान्य
पुणे
: पुणे महापालिकेच्या ९० कोटी रुपयांच्या रस्त्याचे काम आपल्या मर्जितील ठेकेदाराला न मिळाल्यामुळे सत्ताधारी भाजपच्या एका आमदाराने अॅट्रोसिटी दाखल करण्याची धमकी दिल्यानंतर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता सर्व कामे नियमांनुसार आणि पारदर्शक पद्धतीनेच करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
मुळा-मुठा नदीकाठ संवर्धन प्रकल्पांतर्गत संगमवाडी पूल ते बंडगार्डन दरम्यानच्या नियोजित १७ मीटर रुंदीच्या पर्यायी रस्त्यासाठी डिसेंबर २०२५ मध्ये ९० कोटींची निविदा काढण्यात आली होती. त्यावेळी भाजपच्या एका आमदाराने एका पात्र ठेकेदाराला अपात्र ठरवण्यासाठी आणि रस्त्याचे काम आपल्याच मर्जितील ठेकेदारास मिळण्यासाठी प्रशासनावर दबाव आणला होता. यामुळे निविदा प्रक्रिया थांबली होती. हा प्रकार महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना समजल्यानंतर त्यांनी नियमानुसार निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश पथ विभागाला दिले. ज्या ठेकेदाराला अपात्र करण्यासाठी संबंधित आमदार दबाव आणत होते, त्याचीच निविदा सर्वांत कमी दराची आली. त्यामुळे आमदाराच्या मर्जितील ठेकेदाराला काम मिळू शकले नाही. यामुळे संतापलेल्या आमदाराने थेट महापालिका आयुक्तांना मोबाइलवरून अॅट्रोसिटीची धमकी दिली. तसेच अन्य अधिकार्यांना शिवीगाळ करत थेट विधिमंडळात हक्कभंगाची धमकी दिली.
नियम बाजूला ठेऊन काम करणार नाही
या पाश्वर्र्भूमीवर माध्यमांशी बोलताना आयुक्त राम म्हणाले, निविदा प्रक्रियेबाबत प्रशासकीय दृष्ट्या योग्य तोच निर्णय घेण्यात आला आहे. निविदेमध्ये माझा कोणताही वैयक्तिक रस नसतो. नियम बाजूला ठेवून मी कोणतेही काम करू शकत नाही. मी कोणाच्या सांगण्यावरून किंवा दबावाखाली येऊन निर्णय घेणारा अधिकारी नाही. कामांमध्ये कोणतीही दुटप्पी भूमिका न ठेवता पूर्ण पारदर्शकता आणि निष्पक्षता असावी, असे राज्याच्या मुख्यमंत्र्यांचेही स्पष्ट आदेश आहेत. त्यामुळे दबाव आणून काम करण्याचे प्रयत्न निष्फळ ठरतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Related
Articles
25 वर्षे राष्ट्रसेवेची, विकासाची आणि अभिमानाची
07 Oct 2026
तब्बल दहा वर्ष तरूण कोठडीत आरोपी म्हणून जगला!
05 Oct 2026
पृथ्वी शॉ महाराष्ट्राचा कर्णधार; रणजीत नेतृत्वाची धुरा
06 Oct 2026
कुसल मेंडिस श्रीलंकेचा कसोटी कर्णधार
09 Oct 2026
तुर्कियेच्या मालवाहू जहाजावर ड्रोन हल्ला
08 Oct 2026
कुमकुमला महिला वैयक्तिक रिकर्वमध्ये विजेतेपद
04 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान