E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
मतदारांच्या घरी जाऊन बीएलओ कागदपत्रे गोळा करणार
Wrutuja pandharpure
01 Oct 2026
दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी १२ ऑक्टोबरपर्यंत मुदत
पुणे
: मतदार यादीच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षणात (एसआयआर) नोटीस मिळालेल्या मतदारांना आता कागदपत्रे सादर करण्यासाठी निवडणूक कार्यालयात जाण्याची गरज राहणार नाही. बूथस्तरीय अधिकारी (बीएलओ) त्यांच्या घरी जाऊन आवश्यक कागदपत्रे गोळा करतील. त्यामुळे संबंधित मतदारांची कार्यालयात जाण्याची धावपळ कमी होणार आहे.दावे व हरकती दाखल करण्याची मुदत १२ ऑक्टोबर पर्यंत वाढविण्यात आली आहे. दावे, हरकती आणि नोटिसांवरील कार्यवाही १० नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. कामगार, बेघर आणि इतर गरजू मतदारांच्या मदतीसाठी आवश्यकतेनुसार मदत कक्ष किंवा विशेष शिबिरे आयोजित करण्याचे निर्देशही आयोगाने दिले आहेत.
नकाशीकरण न झालेल्या किंवा नोंदींमध्ये विसंगती आढळलेल्या मतदारांसाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. बीएलओ संकलित केलेली कागदपत्रे ईसीआयनेट प्रणालीवर अपलोड करतील. त्यानंतर निवडणूक नोंदणी अधिकारी त्यावर निर्णय घेतील. भारत निवडणूक आयोगाच्या २६ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक कार्यालयाने दिली.अपवादात्मक प्रकरणांमध्ये सुनावणी आवश्यक असल्यास ती शक्यतो ऑनलाइन घेतली जाईल. गरज पडल्यास मतदाराच्या वतीने कुटुंबातील प्रौढ सदस्यही सुनावणीला उपस्थित राहू शकेल.एसआयआर पूर्ण झालेल्या २० राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये नाव राहून गेलेल्या नागरिकांना, तसेच नव्याने पात्र झालेल्या मतदारांना मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी अर्ज करता येणार आहे. त्यांच्या नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Related
Articles
जिबूतीजवळ बोट उलटून १०९ जणांचा मृत्यू
12 Oct 2026
अहमदाबादमध्ये दहा शाळांना बॉम्बची धमकी
08 Oct 2026
बिबट्यांचा मुक्त संचार...
12 Oct 2026
लेखक-वाचक संवादातून वाचनसंस्कृतीला बळ : रामदास नेहूलकर
12 Oct 2026
श्रीसूक्त पठणातून महालक्ष्मी देवीची स्तुती
13 Oct 2026
राहुल यांनी गैरवर्तन केल्याचा गर्भवती पत्रकाराचा आरोप
14 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात