सोमनाथजवळ बस अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू; १६ जखमी   

गीर सोमनाथ (गुजरात) : गुजरातच्या गीर सोमनाथ जिल्ह्यात बुधवारी गुजरात राज्य मार्ग परिवहन महामंडळाची  बस आणि मालमोटार यांच्यात अपघातात दोन जण ठार झाले, तर १६ जण जखमी झाले. गीर गढडा तालुक्यातील बेडिया गावाजवळ  हा अपघात सकाळी ७ च्या सुमारास झाला, बस अमरेली जिल्ह्यातील खांभा येथून गीर सोमनाथमधील उनाकडे जात होती, तर कापूस घेऊन जाणारी मालमोटार विरुद्ध दिशेने येत होती. बस आणि मालमोटारीची समोरासामोर  धडक झाली. असे पोलीस उपनिरीक्षक व्ही. एन. मोरवडिया यांनी  सांगितले. मालमोटार चालकासह दोघांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. बसचालकाची प्रकृती चिंताजनक आहे .माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तपास सुरू केला.

Related Articles