भाजपची सत्ता आल्यास पंजाब ड्रगमुक्त करू : शहा   

जालंधर : पंजाबमधील आपच्या सरकारने अमली पदार्थांना मोकळे रान दिले आहे, अमली पदार्थाचा मुक्त व्यापार सुरू आहे, असा आरोप गृहमंत्री अमित शहा यांनी केला असून, भाजपची सत्ता आल्यास राज्य अमली पदार्थमुक्त करू, अशी घोषणा बुधवारी त्यांनी केली.राज्यात पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर जालंधरमधील भाजपच्या मेळाव्यात ते बोलत होते. भाजपने डिसेंबर २०२९ पर्यंत अमली पदार्थ मुक्त पंजाब मोहीम हाती घेतली असल्याचे सांगताना शहा म्हणाले, आम आदमी पक्ष पंजाब अमली पदार्थ मुक्त करू शकेल ? केवळ भाजपच तसे करू शकेल. दरम्यान, नशामुक्त पंजाब यात्रा पक्षाने १८ सप्टेंबरपासून सुरू केली आहे. त्या अंतर्गत मेळावा आयोजित केला होता. 
 
शहा यांनी आरोप केला की, मुख्यमंत्री भगवत मान यांच्या नेतृत्वा खालील आपच्या सरकारने अमली पदार्थ (चित्ता) खुल्या विक्रीस परवानगी दिली आहे. विधानसभेची निवडणूक पंजाब नशामुक्त करण्यासाठी भाजपकडून लढवली जाईल. राज्यातील माता आणि तरुणांना मी वचन देतो की, डिसेंबर २०२९ अखेर राज्य चित्ता या अमली पदार्थांपासून मुक्त झालेले दिसेल. मेळाव्यापूर्वी जालंधर येथे आगमन झाल्यानंतर शहा यानी श्री देवी तालाब मंदिराला भेट दिली आणि अमली पदार्थांचे सेवन केल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबीयांची भेट घेतली.   
 

Related Articles