E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
डीसीसी बँक निवडणुकीत परिचारकांचा दबदबा
Wrutuja pandharpure
01 Oct 2026
पंढरपूरमध्ये विरोधकांसमोर मोठे आव्हान
सोलापूर
, (प्रतिनिधी) : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पंढरपूर तालुक्याचे नाव घेतले की, सर्वप्रथम परिचारक गटाची सहकारातील संघटनात्मक ताकद समोर येते. तब्बल आठ वर्षांनंतर होत असलेल्या या निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीतही पंढरपूरमधील संस्थांच्या ठरावांमुळे परिचारक गटाचे वजन पुन्हा अधोरेखित झाले आहे. सोसायटी मतदारसंघात पंढरपूरमधून १८१ ठराव झाल्याने जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये हा आकडा सर्वाधिक आहे.
परिचारक कुटुंबाचे जिल्हा बँकेशी असलेले नातेही जुने आहे. सुधाकरपंत परिचारक यांनी तब्बल ४९ वर्षे जिल्हा बँकेचे संचालक म्हणून काम केले. त्यानंतर प्रशांत परिचारक यांनी ही परंपरा पुढे नेली. त्यामुळे यावेळीही पंढरपूरच्या सोसायटी मतदारसंघातून परिचारक कुटुंबाचा दावा महत्त्वाचा मानला जात आहे.
मात्र यावेळची निवडणूक केवळ परिचारक विरुद्ध विरोधक अशी सरळ लढत राहणार का, हा खरा प्रश्न आहे. पंढरपूरच्या सहकारातील राजकीय समीकरणे गेल्या काही काळात बदलली आहेत. विठ्ठल परिवारातील वेगवेगळे प्रवाह स्वतंत्रपणे सक्रिय झाले असून आमदार अभिजित पाटील, कल्याणराव काळे, भगीरथ भालके यांच्यासह अन्य नेत्यांची भूमिका निवडणुकीच्या पुढील टप्प्यात महत्त्वाची ठरणार आहे.
पंढरपूरमध्ये परिचारक गटाला आव्हान देण्यासाठी इच्छुकांची कमतरता नाही. मतदार यादीत अनेक प्रमुख राजकीय आणि सहकार क्षेत्रातील नेत्यांची नावे आहेत. मात्र हे नेते एकाच छताखाली येतात का, हा निवडणुकीचा निर्णायक मुद्दा ठरू शकतो. कारण डीसीसीच्या निवडणुकीत केवळ वैयक्तिक राजकीय ताकद पुरेशी ठरत नाही. सहकारी संस्थांचे ठराव, मतदारसंघातील संस्थात्मक संबंध आणि शेवटच्या टप्प्यातील समन्वय यांना मोठे महत्त्व असते. त्यामुळे विरोधकांपैकी एखादा स्वतंत्रपणे मैदानात उतरतो की अनेक गट एकत्र येऊन पर्याय उभा करतात, याकडे आता लक्ष लागले आहे.
प्रशांत परिचारक स्वतः निवडणूक लढणार की कुटुंबातील अन्य व्यक्तीला संधी मिळणार, याबाबतची उत्सुकता कायम आहे. दुसरीकडे विरोधी गटांमध्येही उमेदवारीच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे सध्या पंढरपूरच्या राजकीय वर्तुळात एका नावापेक्षा आघाड्यांची चर्चा अधिक रंगू लागली आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादीवर ३० सप्टेंबरपर्यंत हरकती दाखल करता येणार आहेत. त्यानंतर ९ ऑक्टोबरपर्यंत हरकतींवर निर्णय होऊन १४ ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे. त्यामुळे उमेदवारीचे खरे चित्र त्यानंतरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
पंढरपूरचा निकाल ठरवणार समीकरण
पंढरपूरमध्ये परिचारक गटाची सहकारातील पकड ही निवडणुकीतील एक महत्त्वाची बाजू आहे. दुसरीकडे विरोधी गटांकडे असलेली राजकीय ताकद एकत्रित स्वरूपात वापरली जाते का, हे पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे.
Related
Articles
श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेस सोन्याचे दोन तुळशी हार अर्पण
12 Oct 2026
आरबीआयचे धोरण
12 Oct 2026
दहशतवादी युनूस येथे कसा?
14 Oct 2026
कुशल तंत्रज्ञांवर निर्बंध (अग्रलेख)
13 Oct 2026
नेपाळला पुन्हा पुराचा फटका
12 Oct 2026
युक्रेनचा अध्यक्ष बदलण्याची गरज : ट्रम्प
12 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात