E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
हृदय शस्त्रक्रियेसाठी सोलापुरातून १९ बालके मुंबईकडे रवाना
Wrutuja pandharpure
01 Oct 2026
सोलापूर
, (प्रतिनिधी) : सेवा संकल्प अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि जिल्हा शीघ्र हस्तक्षेप निदान व उपचार केंद्र, जिल्हा रुग्णालय, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हृदय शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या १९ बालकांना विशेष बसद्वारे बालाजी रुग्णाल मुंबई येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले.
या विशेष बसला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी हिरवा झेंडा दाखवून बालकांना मुंबईकडे रवाना केले. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील हृदयरोग असलेल्या व शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या बालकांची तपासणी करून त्यांची उपचारासाठी निवड करण्यात आली आहे. शस्त्रक्रियेसाठी निवड झालेल्या बालकांच्या पालकांना शिबिराच्या पंधरा दिवस अगोदर पूर्वसूचना देण्यात आली. तसेच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यात आली असून, मुंबई येथे होणार्या मोफत हृदय शस्त्रक्रिया शिबिराबाबत पालकांचे समुपदेशन करण्यात आले.या उपचारासाठी प्रत्येक बालकासोबत दोन पालकांना पाठविण्यात आले असून, एकूण १९ बालकांना विशेष बसद्वारे मुंबईकडे रवाना करण्यात आले आहे. बालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बससोबत वैद्यकीय पथकाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
बालक व त्यांच्या पालकांसाठी मुंबई येथील उपचारादरम्यान ये-जा करण्याचा प्रवास, निवास, नाश्ता, भोजन तसेच आवश्यक वैद्यकीय सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील बालकांना कोणताही आर्थिक भार न पडता आवश्यक हृदय शस्त्रक्रियेची सुविधा मिळणार आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या माध्यमातून लवकर निदान, वेळेवर उपचार आणि आवश्यक शस्त्रक्रिया उपलब्ध करून देत बालकांना निरोगी जीवनाची संधी देण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे.सेवा संकल्प अभियानांतर्गत १९ बालकांना हृदय शस्त्रक्रियेसाठी मुंबईकडे रवाना करण्यात आल्याने त्यांच्या निरोगी भविष्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.
Related
Articles
‘नाना’ म्हणजे बुद्धिमत्ता, कल्पकता आणि संवेदनशीलतेचा संगम
09 Oct 2026
गरिबांच्या जेवणाची जबाबदारी केंद्रचालकांच्या खिशावर
09 Oct 2026
जॉर्जियाच्या दंतचिकित्सकामुळे वैमानिक मच्छार यांना जीवदान
08 Oct 2026
आता चौकशी आणि कारवाईची कसोटी
13 Oct 2026
रूम रेंट, को-पेमेंट आणि डिडक्टिबल्स
12 Oct 2026
खरीप पिके करपली; हंगाम हातचा गेला
11 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात