E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
लक्षद्वीपजवळ तीन हजार कोटींचे अमली पदार्थ जप्त
Samruddhi Dhayagude
01 Oct 2026
इराणी बोटीतील पाच पाकिस्तानी नागरिकांना अटक
नवी दिल्ली भारतीय तटरक्षक दल, केंद्रीय गुप्तचर संस्था आणि गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्तपणे लक्षद्वीप परिसरात संयुक्तपणे कारवाई केली. त्या अंतर्गत तीन हजार कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणी पाच पाकिस्तानी नागरिकांना अटक केली आहे.
एका इराणी बोटीतून ५३६ किलो मेथॅम्फेटामाइन आणि हेरॉइन हे अमली पदार्थ जप्त केले आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबतची पोस्ट समाज माध्यमांवर टाकली आहे. केंद्र सरकार आपल्या तरुणांना अमली पदार्थांच्या विळख्यापासून वाचवण्यासाठी कटिबद्ध आहे. ही कारवाई लक्षद्वीपच्या वायव्येस १६० सागरी मैल आणि मुंबईच्या नैऋत्येस ४९० सागरी मैल अंतरावर, भारताच्या ’विशेष आर्थिक क्षेत्रात’ २५ सप्टेंबर रोजी कारवाई करण्यात आली. पाच पाकिस्तानी नागरिकांना अटक केली आहे. त्यांची ओळख पटविण्याचे आणि या प्रकरणाचा तपास सुरू आहे. गुप्तहेर विभागाने दिलेल्या माहितीनुुसार तटरक्षक दलाने मोहीम राबविली होती. संशयित बोटीचा माग पाहणीने काढला होता. बोट लक्षद्वीपजवळ पोहोचण्यापूर्वीच ती पकडली आणि अमली पदार्थ जप्त केले. जप्त केलेले पदार्थ मुंबईत आणले गेले. मोहिमेत गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने भाग घेतला होता. त्यांनी पाकिस्तानच्या पाच नागरिकांना अटक केल्याच्या माहितीला दुजोरा दिला. या कारवाईमुळे समुद्रमार्गे होणार्या अमली पदार्थांच्या वाहतुकीचा छडा लागला आहे.
Related
Articles
वैभव की संजू; संघनिवडीचा पेच
09 Oct 2026
सातार्यात ४१ गावे आणि २४० वाड्या तहानलेल्या
08 Oct 2026
काळेवाडीत खासगी शाळेच्या बसचा अपघात
13 Oct 2026
आता जंतर-मंतरवर आंदोलन करता येणार नाही
13 Oct 2026
आधी नियोजन, आता निधी कपात; जिल्हा परिषदेत सदस्यांची कोंडी
13 Oct 2026
पीएमपीच्या ई-बसची बॅटरी लवकर डिस्चार्ज
12 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात