निवडणूक आयोगाकडून ‘फॉर्म ६’ मधील वादग्रस्त बदल अखेर मागे   

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने फॉर्म ६ मधील वादग्रस्त बदल अखेर मागे घेतला आहे. दोन निवडणूक आयुक्तांनी याबाबत आक्षेप घेतला होता. ज्या राज्यांमध्ये मतदारांची विशेष तीव्र पडताळणी (एसआयआर) मोहीम पूर्ण झाली आहे, त्या ठिकाणी हा बदल करण्यात आला आहे. फॉर्म ६ चा वापर मतदार यादीत नवीन मतदारांची नोंद करण्यासाठी केला जातो. हे घोषणापत्र निवडणूक आयोगाच्या ‘इसीआयएनइटी’ पोर्टलवरील ऑनलाईन फॉर्ममध्ये जोडण्यात आले होते. निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी फॉर्म ६ मध्ये एसआयआर घोषणापत्राचा समावेश करण्यावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर हा बदल करण्यात आला. या फॉर्ममध्ये बदल करण्याचा अधिकार केवळ केंद्रीय कायदा मंत्रालयाला आहे. ज्या राज्यांमध्ये एसआयआरनंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली, तिथून फॉर्म ६ मध्ये जोडलेले हे घोषणापत्र ‘इसीआयएनइटी’ पोर्टलवरून काढून टाकण्यात आले. 

Related Articles