जालंधर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौर्यापूर्वी बुधवारी बॉम्बच्या धमकीचा ई-मेल प्राप्त झाला. या ई-मेलद्वारे शाळा, सभा स्थळ, देवी तलाव मंदिर आणि न्यायालय परिसराला बॉम्बची धमकी देण्यात आली. त्यानंतर, सुरक्षा दलामध्ये मोठी खळबळ उडाली. दरम्यान, सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली. ’नशा मुक्त पंजाब यात्रा’च्या समारोपानिमित्त जालंधरमधील परागपूर गावात एका जाहीर सभेला शहा यांनी संबोधित केले. या दौर्यापूर्वी धमकीचा ई-मेल प्राप्त झाला होता. ई-मेल बनावट असल्याचे तपासानंतर स्पष्ट झाले असून, ई-मेल पाठविणार्याचा शोध घेतला जात आहे. मागील काही दिवसांत पंजाब-हरयानात धमकीचे अनेक ई-मेल शाळा, महाविद्यालयांसह महत्त्वाच्या ठिकाणांना मिळाले आहेत.
Fans
Followers