E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
टँकरग्रस्त गावांची संख्या २ हजारावर
Samruddhi Dhayagude
01 Oct 2026
मुंबई, (प्रतिनिधी) : पावसाअभावी राज्यावर दुष्काळाची छाया गडद झाली असतानाच आता पाणीटंचाईने शेतकर्यांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाल्यामुळे ४१८ गावे आणि १ हजार ५६८ वाड्यांना टँकरद्वारे पिण्याचे पाणीपुरवठा केला जात आहे.
पाणीटंचाईची ही स्थिती प्रामुख्याने राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये दिसून येत आहे. नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
पावसाच्या खंडानंतर ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आकडेवारीनुसार ७ ते १३ सप्टेंबर दरम्यान राज्यातील ३६२ गावे आणि १ हजार ३५४ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. त्यावेळी ४११ टँकर कार्यरत होते. त्यानंतरच्या आठवड्यात म्हणजेच १४ ते २० सप्टेंबर या काळात टंचाईग्रस्त गावांची संख्या ३६२ वरून ४१८ वर पोहोचली, म्हणजेच ५६ गावांची वाढ झाली आहे. तसेच टँकरवर अवलंबून असलेल्या वाड्यांची संख्याही २१४ ने वाढून १ हजार ५६८ झाली आहे. मात्र, एकूण टँकरची संख्या मागील आठवड्याच्या तुलनेत ४११ वरून ४७९ वर आली आहे. यामध्ये शासकीय टँकरची संख्या १० इतकीच असून खासगी टँकरची संख्या वाढलेली आहे.
मराठवाड्यात टंचाईची झळ
छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये टँकरची मागणी कायम आहे. विशेषतः ग्रामीण भागातील विहिरी, बोअरवेल तसेच अन्य स्थानिक जलस्रोतांमधील उपलब्ध पाण्यावर मोठा ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांतील काही भागांतही टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतही टंचाईग्रस्त गावांना टँकरच्या माध्यमातून पाणी देण्यात येत आहे. प्रशासनासमोर पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचे आव्हान असून पावसाचा खंड वाढल्यास टंचाईग्रस्त गावांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने उपलब्ध जलस्रोतांचे नियोजन करण्यावर भर देणे आवश्यक झाले आहे.
Related
Articles
ब्रिटिशकालीन पूल होणार इतिहासजमा
08 Oct 2026
दूध भेसळीच्या साखळीचा पर्दाफाश
08 Oct 2026
बँक ठेवी आणि शेअर्सची माहिती आता एकाच विवरणपत्रात
12 Oct 2026
दुष्काळग्रस्त शेतकर्यांना कर्नाटकाच्या धर्तीवर सरसकट मदत द्या
13 Oct 2026
दोन अमेरिकी अर्थतज्ज्ञांना अर्थशास्त्रातील नोबेल
13 Oct 2026
पाकिस्तानात पिठाच्या किमती भडकल्या
09 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात