E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
फॅशन बदलली अन् बांगड्यांचा झगमगाट मंदावला!
Samruddhi Dhayagude
01 Oct 2026
जुन्नर तालुक्यातील कोटींची उलाढाल अर्ध्यावर
बेल्हे, (वार्ताहर) : ग्रामीण भागातील लग्नसमारंभ असो, सण-उत्सव असो किंवा धार्मिक विधी... सौभाग्यवतीच्या हातातील रंगीबेरंगी बांगड्यांना आजही विशेष महत्त्व आहे. मात्र, काळ बदलला, फॅशन बदलली आणि त्याचा थेट परिणाम या पारंपरिक व्यवसायावर झाला आहे. कधीकाळी जुन्नर तालुक्यात तब्बल एक कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या बांगड्यांच्या व्यवसायाची उलाढाल आता केवळ ५० लाख रुपयांवर आल्याचे व्यावसायिक सांगतात.
पूर्वी जुन्नर तालुक्यातील जवळपास प्रत्येक गावात कासार समाजातील व्यावसायिक बांगड्या भरण्याचे काम करीत होते. कालांतराने मुस्लिम समाजातील अनेक व्यावसायिकही या व्यवसायात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. त्यामुळे गावागावांत बांगड्यांची छोटी-मोठी दुकाने आणि फिरते व्यवसायिकांचे जाळे निर्माण झाले.
काचेच्या बांगड्यांपासून लाखेच्या बांगड्या, सोन्याच्या पाटल्या आणि त्यानंतर प्लास्टिकच्या बांगड्यांपर्यंत या व्यवसायाने अनेक बदल पाहिले. तालुक्यात ओतूर, जुन्नर, आळेफाटा, बेल्हे आणि नारायणगाव येथे बांगड्यांचे घाऊक व्यापारी असून, त्यांच्या माध्यमातून तालुक्यातील विविध गावांमध्ये बांगड्यांचा पुरवठा केला जातो. मात्र, गेल्या काही वर्षांत या व्यवसायासमोर आव्हाने वाढली आहेत.
तरुण पिढीमध्ये काचेच्या पारंपरिक बांगड्यांपेक्षा मेटल ब्रेसलेट, प्लास्टिकच्या बांगड्या तसेच सिल्क थ्रेडच्या बांगड्यांना पसंती मिळत आहे. परिणामी काचेच्या बांगड्यांची नियमित मागणी घटली आहे. पूर्वी रोजच्या वापरातही काचेच्या बांगड्यांना मोठी मागणी होती. आता मात्र त्यांचा वापर प्रामुख्याने सण-उत्सव, लग्नसराई आणि धार्मिक कार्यक्रमांपुरता मर्यादित होत असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
याशिवाय कच्च्या मालाच्या वाढत्या किमती, उत्पादन खर्च, बदलते फॅशन ट्रेंड आणि जागतिक बाजारपेठेतील घडामोडींचाही या व्यवसायावर परिणाम होत आहे. भारतातील मोठ्या प्रमाणावर काचेच्या बांगड्यांचे उत्पादन उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथे होते. या उद्योगाशी तेथील लाखो कुटुंबांची उपजीविका जोडलेली आहे.
एकीकडे ग्राहकांची आवड बदलत आहे, तर दुसरीकडे पारंपरिक व्यवसायाचा खर्च वाढत आहे. त्यामुळे पिढ्यान्पिढ्या बांगड्यांचा व्यवसाय करणार्या छोट्या व्यावसायिकांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. बांगड्या हा केवळ शृंगाराचा भाग नसून, ग्रामीण महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे.
त्यामुळे बदलत्या फॅशनच्या काळात या पारंपरिक व्यवसायाला नव्या बाजारपेठेची आणि बदलत्या ग्राहकांच्या पसंतीनुसार उत्पादनांची गरज निर्माण झाली आहे. हातात बांगड्यांचा खणखणाट कायम असला, तरी या व्यवसायाच्या गल्ल्यातील खणखणाट मात्र कमी झाल्याचे चित्र जुन्नर तालुक्यात दिसत आहे.
Related
Articles
वासोटा किल्ला गुरुवारपासून पर्यटनासाठी खुला
11 Oct 2026
आत्महत्याग्रस्त माळी कुटुंबाला राजेंद्र राऊत यांनी दिला आधार
08 Oct 2026
उजनीतून शेतीसाठीचे पाणी बंद; रब्बी हंगामाचे गणित बिघडणार
13 Oct 2026
शमीच्या भेदक मार्यामुळे बंगालने दिल्लीला 240 धावांवर रोखले
12 Oct 2026
मुंबईचा चंडीगढवर डावाने विजय
14 Oct 2026
ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचे निधन
13 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात