E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
सोमेश्वर कारखाना निवडणुकीला अनपेक्षित वळण
Samruddhi Dhayagude
01 Oct 2026
सोमेश्वरनगर, (वार्ताहर) : मागील तेरा वर्षांत तेरा पुरस्कार पटकावून देशभरात नावलौकिक केलेल्या व राज्यात उच्चांकी भाव देणार्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक अनपेक्षितपणे रंगतदार ठरली. कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी वेगळा पॅनल करून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार, जय पवार यांच्या पॅनलला आव्हान निर्माण केले आहे.
गेली अनेक वर्ष या कारखान्यावर पवारांची सत्ता आहे. अजित पवार असताना निवडणूक बिनविरोध देखील झाली आहे. मात्र, यावेळी सर्वच पक्षांनी निवडणुकीत भाग घेतल्याने व विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांना विश्वासात न घेता पवार गटाने पॅनल बनवल्याने जगताप यांनी बुधवारी सकाळी संवाद मेळावा घेत भाजपचे माजी आमदार संजय जगताप व सभासदांना घेऊन आपली भूमिका स्पष्ट करत कारखान्याच्या जमिनी घेणार्यांना संचालक मंडळात संधी दिल्याने आपण वेगळा पॅनल करत असल्याचे जाहीर केले. त्यांनी अजितदादा विकास पॅनेलच्या माध्यमातून २१ उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे कारखाना निवडणुकीत आता पवार गट, शरद पवार गट व पुरुषोत्तम जगताप गट असे तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी, बुधवारी समर्थकांच्या मेळाव्यानंतर पुरुषोत्तम जगताप व संजय जगताप यांनी पत्रकार परिषद घेत २१ उमेदवारांची घोषणा केली. या घडामोडीमुळे गेल्या काही दिवसांपासून पडद्यामागे सुरू असलेल्या राजकीय हालचालींना आता उघड स्वरूप आले आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पुरुषोत्तम जगताप यांच्यात मंगळवारी रात्री उशिरापर्यंत चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र, या चर्चेतून अंतिम तोडगा निघाला नसल्याचे सांगितले जात आहे. या घडामोडीमुळे सोमेश्वरच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलली आहेत.
पुरुषोत्तम जगताप ‘लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनेल’चे नेतृत्व करणार आहेत. पॅनेलमध्ये विद्यमान संचालक विश्वास जगताप, मिलिंद कांबळे, माजी पंचायत समिती सदस्य राहुल भापकर, कारखान्याचे माजी संचालक महेश काकडे, सचिन खलाटे, महेश राणे यांना स्थान देण्यात आले आहे. तसेच माजी सरपंच सतीश सकुंडे, वैभव गायकवाड, गोरख खोमणे, निलेश केदारी आणि धनंजय गडदरे यांच्यासह विविध भागांतील उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.
पुरुषोत्तम जगताप यांनी घेतलेली स्वतंत्र भूमिका, संजय जगताप यांची मिळालेली साथ आणि शरदचंद्र पवार पक्षाची स्वतंत्र तयारी यामुळे सोमेश्वर कारखाना निवडणुकीतील समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. त्यामुळे प्रचाराच्या पुढील टप्प्यात कोणत्या गटाकडून कोणते मुद्दे मांडले जातात, कोणत्या उमेदवारांना सभासदांचा प्रतिसाद मिळतो आणि तीनही पॅनेलची मतविभागणी कशी होते, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.
आता ‘सोमेश्वर’मध्ये तिरंगी लढत निश्चित झाल्याने ११ ऑक्टोबरच्या मतदानाकडे व निकालाकडे राज्याचे लक्ष लागणार आहे. तसेच जय पवार यांनी आपण विकासावर प्रचार करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र प्रचारामध्ये काकडे जगताप वादावर होणारी टीका टिप्पणी मुळे निवडणुकीत रंगत वाढेल असे चित्र झाले आहे. पवार गटाने त्यांचे उमेदवारी यादीमध्ये पुरुषोत्तम जगताप यांचे नाव जाहीर केले असताना त्यांनी वेगळा पॅनल केल्याने निवडणुकीत रंगत वाढली आहे.
शरदचंद्र पवार पक्षाचीही स्वतंत्र तयारी
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडूनही २१ उमेदवारांची जुळवाजुळव पूर्ण झाल्याची माहिती असून, पक्षाची अंतिम यादी गुरुवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजित पवार गट, शरदचंद्र पवार गट आणि पुरुषोत्तम जगताप-संजय जगताप समर्थित पॅनेल अशा तीन प्रमुख गटांमध्ये लढत होण्याचे चित्र निर्माण झाले आहे.
यापूर्वी २१ जागांसाठी छाननीनंतर तब्बल ५१४ उमेदवार रिंगणात होते. ३० सप्टेंबरला माघारीची अंतिम मुदत असून, २ ऑक्टोबरला अंतिम उमेदवार यादी व निवडणूक चिन्हांचे वाटप होणार आहे. ११ ऑक्टोबरला मतदान, तर १२ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.
Related
Articles
खंबाटकी घाटात वाहतूक कोंडी सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांची गर्दी
03 Oct 2026
सुग्रीवामुळे कुंभकर्णाला मिळाले जीवदान
05 Oct 2026
टिळक भवनात आदिवासी विद्यार्थ्यांना अटक
06 Oct 2026
अमेरिकेत नोकरी महागणार; मोजावे लागणार ६८ लाख
09 Oct 2026
एमपीएससी सचिव हरपाळकर यांची उचलबांगडी
03 Oct 2026
ऊसतोड कामगारांवर बेरोजगारीचे संकट : तुळजापूरकर
06 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान