E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
कात्रज बोगद्याजवळ दाम्पत्याला लुटले
Wrutuja pandharpure
01 Oct 2026
पुणे
: संकष्ट चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी दुचाकीवरून निघालेल्या दाम्पत्याला कात्रज बोगद्याजवळ लुटल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली. दुचाकी अडवून मोटारीची चावी काढून घेतल्यानंतर महिलेच्या गळ्यातील एक लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेण्यात आले. या प्रकरणी आंबेगाव पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, एकाला अटक करण्यात आली आहे.
याबाबत दाम्पत्याने आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. मंगळवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास फिर्यादी आणि त्यांची पत्नी दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी पुण्याच्या दिशेने येत होते. कात्रज बोगदा पार केल्यानंतर जुन्या सातारा-पुणे महामार्गावरील दुसर्या वळणावर दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी त्यांना अडविले. आरोपींनी फिर्यादीच्या दुचाकीची चावी काढून घेतली. त्यानंतर त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे एक लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून घेतले. या प्रकरणी आंबेगाव पोलिस ठाण्यात आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तौहिद असलम शहा (वय २३), सुलेमान यासिन शेख (वय २१) आणि रोहित बबलू सिंग (वय २०) अशी आरोपींची नावे आहेत. त्यापैकी रोहित सिंग याला पोलिसांनी अटक केली आहे. अन्य फरारी आरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपास आंबेगाव पोलिस करीत आहेत.
Related
Articles
शेअर बाजाराची उसळी
09 Oct 2026
सह्याद्रीच्या व्याघ्रप्रकल्प आराखड्याला मंजुरीची प्रतीक्षा
08 Oct 2026
कुमकुमला महिला वैयक्तिक रिकर्वमध्ये विजेतेपद
04 Oct 2026
डाळिंबाचा ट्रक चालकांनीच पळवला
05 Oct 2026
‘एमपीएससी’ आंदोलनामुळे वाहतुकीचा खोळंबा
07 Oct 2026
दुष्काळी उपाययोजनांसाठी अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती
07 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान