भारताचा विक्रमी विजय   

गिलचे सर्वांत वेगवान द्विशतक, रोहितचे ३५वे शतक; वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका विजय

गुवाहाटी : वेस्ट इंडीज विरूद्धच्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात भारताने पहिल्यांदाच ४०० हून अधिक धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. बुधवारी झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजने ५० षटकांत ७ गडी गमावून ४०५ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने ४३.३ षटकांत २ गडी गमावून लक्ष्य गाठले. या विजयासह भारताने तीन सामन्यांची मालिका २-० अशी खिशात घातली. कर्णधार शुभमन गिल भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने वन-डे क्रिकेटमधील सर्वांत वेगवान द्विशतक झळकावले. गिलने अवघ्या ११७ चेंडूंत २०० धावांचा टप्पा पार केला. त्याने १३३ चेंडूंत नाबाद २२३ धावांची तुफानी खेळी केली. या खेळीत त्याने २६ चौकार आणि ८ षटकार ठोकले. गिलने रोहित शर्मासोबत पहिल्या गड्यासाठी २५५ धावांची भागीदारी केली. रोहितनेही शतक झळकावत १०१ धावांची खेळी केली. विराट कोहली २९ धावांवर बाद झाला. गिलसोबत ऋतुराज गायकवाड ३१ धावांवर नाबाद राहिला.

Related Articles