E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
लव्हलिना सुवर्णपदकापासून एक पाउल दूर
Wrutuja pandharpure
01 Oct 2026
आयची-नागोया
: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय बॉक्सरची दमदार कामगिरी सुरू आहे. ऑलिम्पिक पदक विजेती लव्हलिना बोर्गोहेनने अंतिम फेरी गाठली असून, ती आता सुवर्णपदकासाठी लढणार आहे. प्रिया घंघस आणि कपिल पोखरियाला उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागल्याने त्यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. महिलांच्या ७५ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत लव्हलिनाने कझाकस्तानच्या नताल्या बोगदानोव्हाचा स्प्लिट निर्णयाद्वारे ३-२ असा पराभव केला. पहिली फेरी २-३ अशी गमावल्यानंतर लव्हलिनाने रणनीती बदलत आक्रमक खेळ केला. पुढील दोन्ही फेर्यांमध्ये वर्चस्व राखत तिने अंतिम फेरी निश्चित केली. दुसर्या फेरीत पाचही पंचांनी तिला १०-१० गुण दिले.
महिलांच्या ६० किलो गटात प्रियाला चीनच्या यांग चेंग्यूकडून १-४ असा पराभव पत्करावा लागला. निशियो जिम्नॅशियममध्ये झालेल्या सामन्यात प्रियाने आक्रमक सुरुवात केली; मात्र यांगने प्रभावी बचाव करत सामना आपल्या बाजूने वळवला. उपांत्य फेरीपूर्वी प्रियाने ताजिकिस्तानच्या मिझगोना समादोव्हाचा ५-० असा पराभव केला होता. तसेच उपउपांत्यपूर्व फेरीत दक्षिण कोरियाच्या दोन वेळा जागतिक पदकविजेत्या ओह येओंजीला हरवत तिने मोठा उलटफेर केला होता. पुरुषांच्या ९० किलो गटात कपिल पोखरियाने कांस्यपदक पटकावले. उपांत्य फेरीत त्याला उझबेकिस्तानच्या तुराबेक खाबीबुलाएवकडून स्प्लिट निर्णयाद्वारे ४-१ असा पराभव पत्करावा लागला.
Related
Articles
नायजेरियात लष्करी तळावर बंडखोरांचा हल्ला; १० सैनिकांचा मृत्यू
09 Oct 2026
मुख्य निवडणूक अधिकार्यांच्या कार्यालयाबाहेर ‘आप’चे आंदोलन
08 Oct 2026
शालेय शिक्षण विभागाच्या दोन योजना बंद
11 Oct 2026
उजनीतून शेतीसाठीचे पाणी बंद; रब्बी हंगामाचे गणित बिघडणार
13 Oct 2026
‘नाना’ म्हणजे बुद्धिमत्ता, कल्पकता आणि संवेदनशीलतेचा संगम
09 Oct 2026
‘आयुष्मान’ कार्डबाबतची अडचण दूर
12 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात