E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
भारतीय महिला हॉकी संघ अंतिम फेरीत
Wrutuja pandharpure
01 Oct 2026
नागोया
: भारतीय महिला हॉकी संघाने उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाचा २-० असा पराभव करून आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. या विजयासह भारत सुवर्णपदकापासून एक पाऊल दूर आहे. २ ऑक्टोबरला अंतिम सामन्यात भारताचा सामना चीनशी होणार आहे. सुवर्णपदक जिंकल्यास भारताला २०२८ लॉस एंजिलिस ऑलिम्पिकचे थेट पात्रता स्थान मिळेल. भारतीय महिला संघ तब्बल ४४ वर्षांनंतर आशियाईमध्ये सुवर्णपदक मिळविण्याच्या उंबरठ्यावर आहे.
भारताने संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहून दमदार कामगिरी केली आहे. कोरियाविरुद्ध पहिल्या दोन क्वॉर्टरमध्ये एकही गोल झाला नाही. ४४व्या मिनिटाला इशिकाने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करत भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ४८व्या मिनिटाला सुनेलिता टोप्पोने मैदानी गोल करत आघाडी २-० अशी केली. अखेरपर्यंत कोरियाला गोल करता आला नाही. सामन्याच्या सुरुवातीपासून दोन्ही संघांमध्ये चुरस पाहायला मिळाली. भारताला पहिल्या क्वॉर्टरमध्ये तब्बल नऊ पेनल्टी कॉर्नर मिळाले; मात्र त्याचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. कोरियाच्या भक्कम बचावामुळे पहिला हाफ गोलशून्य बरोबरीत संपला. ३०व्या मिनिटाला भारताच्या बलजीत कौरला ग्रीन कार्ड मिळाले.
Related
Articles
शरद पवार दुष्काळ पाहणीवर पुरंदर तालुक्यात शेतकर्यांशी संवाद
03 Oct 2026
सोलापुरात ई-बस सेवेला वेग
05 Oct 2026
दिल्लीत ५० कोटींचे अमली पदार्थ जप्त
06 Oct 2026
महिला कर्मचार्यांना हटविण्यामागे हिंदू गट नाही
03 Oct 2026
मुंबईच्या रणजी संघातून सूर्यकुमारला वगळले
07 Oct 2026
इंडिगोच्या विमानावर कोसळली वीज
09 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान