E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
वेस्ट इंडिजने उभारला धावांचा डोंगर
Wrutuja pandharpure
01 Oct 2026
रोहितचे शतकी तर गिलची दमदार द्विशतकी खेळी
गुवाहाटी
: वेस्ट इंडिजने दुसर्या वनडेत भारतासमोर ४०६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. वनडे क्रिकेटमधील वेस्ट इंडिजची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी संघाने २०१९ मध्ये इंग्लंडविरुद्ध ३८९ धावा केल्या होत्या. भारताविरुद्धचीही वेस्ट इंडिजची ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. यापूर्वी १९८३ मध्ये जमशेदपूर येथे संघाने भारताविरुद्ध ३३३ धावा केल्या होत्या.प्रत्युत्तरात भारताने ६ षटकांनंतर बिनबाद ४४ धावा केल्या आहेत. कर्णधार शुभमन गिल आणि रोहित शर्मा खेळपट्टीवर आहेत. गुवाहाटी येथे नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने ५० षटकांत ७ बाद ४०५ धावा केल्या. जॉन कॅम्पबेल (१०१), शाई होप (१०४) आणि अमीर जांगू (११४) यांनी शतके झळकावली. भारताकडून कुलदीप यादव आणि गुरनूर बरार यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. कुलदीपने वनडेत २०० बळींचा टप्पाही गाठला. अशी कामगिरी करणारा तो नववा भारतीय ठरला.प्रत्युत्तरात कर्णधार शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी भारताच्या डावाची दमदार सुरुवात केली. रोहितने ७५ चेंडूत १०१ धावा केल्या. तर गिल द्विशतकी खेळी केली. यांच्या खेळीमुळे भारत विजयाच्या उंबरठ्यावर उभा होता.
Related
Articles
रशियासोबत डिझेल खरेदीचा करार
11 Oct 2026
‘आप’चे उद्या आंदोलन
14 Oct 2026
आंबेगाव तालुक्यात शनिवारी भाद्रपद बैलपोळा
08 Oct 2026
जो इतिहास विसरतो, त्याचा र्हास होतो
08 Oct 2026
विद्युत तार तुटल्याने आग; तीन एकर ऊस जळून खाक
14 Oct 2026
रविवार पेठेतील सव्वादोन कोटींच्या सोन्याच्या चोरीचा छडा
14 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात