E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अर्थ
शेअर बाजाराची घसरगुंडी सुरूच
Samruddhi Dhayagude
30 Sep 2026
मुंबई : मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजाराची घसरगुंडी सलग तिसर्या दिवशी बुधवारी सुरूच होती सेन्सेक्स ४९ ने घसरुन ७२ हजार ४८१ वर तर निफ्टी ९६ ने घसरुन २२ हजार ६२१ वर बंद झाला. खनिज तेलाचे वाढते दर, जागतिक रोखे परताव्याचे उंचावलेले दर आणि परदेशी गुंतवणुकीचा कमी झालेला ओघ यामुळे निर्देशांकात घट झाली आहे.
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स दिवसभरात एक़ा क्षणी ५३३.१६ ने वाढून ७३ हजार ६३ पर्यंत गेला होता. नंतर घसरुन बंद झाला. एटर्नल, सन फार्मॉ, टायटन, अदानी पोर्ट्स, टाटा स्टील आणि एचडीएफसी बँकेच्या समभागांचे मूल्य घसरले. या उलट कोटक महिंद्रा बँक, आयसीआयसीआय बँक, इंटरग्लोब एव्हिएशन आणि अॅक्सिस बँकेच्या समभागांचे मूल्य वाढले. आंतरराष्ट्रीय खनिज तेल ब्रेंट क्रूडचा निर्देशांक पाव टक्के वाढून एका पिंपाचा दर १०३.१ डॉलर्स झाला. दरम्यान, शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार मंगळवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ९ हजार ९८०.२२ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली. आशियाीतल दक्षिण कोरियातील निर्देशांक घसरुन तर शांघाय, जपान आणि हाँगकाँगचे वाढून बंद झाले. युरोपमध्ये संमिश्र तर मंगळवारी अमेरिकेचा बाजार घसरुन बंद झाला होता.
भारतीय बाजार कोसळण्याचे प्रमुख कारण नफेखोरी होती. तसेच गुंतवणूकदार समभागांची खरेदी करण्याऐवजी त्यांची विक्री करण्यावर अधिक भर देत आहेत. त्यामागे खनिज तेलाचे दर वाढते दर, अमेरिका आणि इराणमधील तणावाची पार्श्वभूमी आहे. सध्याच्या अस्थिर वातावरणात ते कोणताही धोका पत्करण्यास तयार नसल्याने गुंतवणूक करतान सावध पावले टाकत आहे.
- विनोद नायर, प्रमुख विश्लेषकर, जिओजित इनव्हेस्टमेंट
खनिज तेलाचे दर कळीचा मुद्दा
प्रादेशिक संघर्ष आणि जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर त्याचे होणारे परिणाम यांबाबतची अनिश्चितता कायम असल्याने, खनिज तेलाच्या किमती सत्रादरम्यान बर्यापैकी स्थिर राहिल्या. त्यामुळे बाजाराला कोणतीही नवीन दिशा मिळाली नाही. यामुळेच व्यापक बाजाराचा कल नकारात्मक राहिला नाही. पण, संयमित राहिला.
- पोनमुडी आर, मुख्य कार्यकारी ’एनरिच मनी’
Related
Articles
नायजेरियात लष्करी तळावर बंडखोरांचा हल्ला; १० सैनिकांचा मृत्यू
09 Oct 2026
पावसाच्या लहरीपणामुळे भविष्यात पाणीटंचाईची समस्या उद्भवण्याची शक्यता
12 Oct 2026
रूम रेंट, को-पेमेंट आणि डिडक्टिबल्स
12 Oct 2026
दोन अमेरिकी अर्थतज्ज्ञांना अर्थशास्त्रातील नोबेल
13 Oct 2026
उजनीतून शेतीसाठीचे पाणी बंद; रब्बी हंगामाचे गणित बिघडणार
13 Oct 2026
भिमानगरमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार !
13 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात