E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अर्थ
शेअर बाजाराची घसरगुंडी सुरूच
Samruddhi Dhayagude
01 Oct 2026
मुंबई : मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजाराची घसरगुंडी सलग तिसर्या दिवशी बुधवारी सुरूच होती सेन्सेक्स ४९ ने घसरुन ७२ हजार ४८१ वर तर निफ्टी ९६ ने घसरुन २२ हजार ६२१ वर बंद झाला. खनिज तेलाचे वाढते दर, जागतिक रोखे परताव्याचे उंचावलेले दर आणि परदेशी गुंतवणुकीचा कमी झालेला ओघ यामुळे निर्देशांकात घट झाली आहे.
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स दिवसभरात एक़ा क्षणी ५३३.१६ ने वाढून ७३ हजार ६३ पर्यंत गेला होता. नंतर घसरुन बंद झाला. एटर्नल, सन फार्मा, टायटन, अदानी पोर्ट्स, टाटा स्टील आणि एचडीएफसी बँकेच्या समभागांचे मूल्य घसरले. या उलट कोटक महिंद्रा बँक, आयसीआयसीआय बँक, इंटरग्लोब एव्हिएशन आणि अॅक्सिस बँकेच्या समभागांचे मूल्य वाढले. आंतरराष्ट्रीय खनिज तेल ब्रेंट क्रूडचा निर्देशांक पाव टक्के वाढून एका पिंपाचा दर १०३.१ डॉलर्स झाला. दरम्यान, शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार मंगळवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ९ हजार ९८०.२२ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली. आशियाीतल दक्षिण कोरियातील निर्देशांक घसरुन तर शांघाय, जपान आणि हाँगकाँगचे वाढून बंद झाले. युरोपमध्ये संमिश्र तर मंगळवारी अमेरिकेचा बाजार घसरुन बंद झाला होता.
भारतीय बाजार कोसळण्याचे प्रमुख कारण नफेखोरी होती. तसेच गुंतवणूकदार समभागांची खरेदी करण्याऐवजी त्यांची विक्री करण्यावर अधिक भर देत आहेत. त्यामागे खनिज तेलाचे दर वाढते दर, अमेरिका आणि इराणमधील तणावाची पार्श्वभूमी आहे. सध्याच्या अस्थिर वातावरणात ते कोणताही धोका पत्करण्यास तयार नसल्याने गुंतवणूक करताना सावध पावले टाकत आहे.
- विनोद नायर, प्रमुख विश्लेषक, जिओजित इनव्हेस्टमेंट
खनिज तेलाचे दर कळीचा मुद्दा
प्रादेशिक संघर्ष आणि जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर त्याचे होणारे परिणाम यांबाबतची अनिश्चितता कायम असल्याने, खनिज तेलाच्या किमती सत्रादरम्यान बर्यापैकी स्थिर राहिल्या. त्यामुळे बाजाराला कोणतीही नवीन दिशा मिळाली नाही. यामुळेच व्यापक बाजाराचा कल नकारात्मक राहिला नाही. पण, संयमित राहिला,
- पोनमुडी आर, मुख्य कार्यकारी ’एनरिच मनी’
Related
Articles
बी. फार्मसी, फार्म.डी.च्या प्रवेशाची दुसरी यादी जाहीर
07 Oct 2026
मार्केटयार्डात ‘नो यूपीआय’आंदोलन यशस्वी
03 Oct 2026
जो इतिहास विसरतो, त्याचा र्हास होतो
08 Oct 2026
कोपर्डी अत्याचार प्रकरणात उच्च न्यायालयाकडून घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी
03 Oct 2026
इम्रान यांच्या सुटकेसाठी समर्थकांची इस्लामाबादच्या दिशेने पदयात्रा सुरूच
08 Oct 2026
नरसिंग गिरजी गिरणीची दगडी भिंत केली जमीनदोस्त
08 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान