E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
व्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन भडकले
Samruddhi Dhayagude
30 Sep 2026
स्थानिक नागरिक भारतात येण्यासाठी नियंत्रण रेषेकडे
नवी दिल्ली : व्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी सरकारविरोधातील आंदोलने तीव्र झाली आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्याविरोधात जोरदार घोषणा दिल्या जात आहेत. तसेच, हजारोच्या संख्येने स्थानिक नागरिक भारतात सामील होण्यासाठी नियंत्रण रेषेजवळ दाखल झाले आहेत.
व्याप्त काश्मीर हा पाकिस्तानचा भाग नाही, अशी घोषणा स्थानिकांकडून दिली जात आहे. मागील तीन महिन्यांपासून स्थानिकांनी पाकिस्तान सरकारविरोधात जोरदार लढा पुकारला आहे. व्याप्त काश्मीरमधील मंधोल गावात एका महासभेचे आयोजन करण्यात आले होते. नियंत्रण रेषेपासून अवघ्या ७ किलोमीटर अंतरावर पाकिस्तान सरकारविरोधात यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनात २५ हजारांहून अधिक महिला आणि पुरुषांना सहभाग घेतला होता, असे वृत्त आहे.
या सभेत आवामी कृती समितीचे प्रमुख नेते सरदार अमन खान यांनी पाकिस्तानी लष्कर आणि तेथील प्रशासनाविरुद्ध थेट रणशिंग फुंकले. मागील तीन महिन्यांपासून पाकिस्तानने व्याप्त काश्मीरमधील जनतेचा रेशन पुरवठा पूर्णपणे रोखल्याचा आरोप करत, त्यांनी नियंत्रण रेषा कायमची हटवून जम्मू-काश्मीरमधील पूंछ आणि मेंढर भागात जाण्याची तयारी दर्शवली.
अमन खान यांनी पाकिस्तानी लष्कराच्या भ्याडपणाची पोलखोल केली. पूर्वी जेव्हा नियंत्रण रेषेवर गोळीबार व्हायचा, तेव्हा पाकिस्तानी सैनिक लपून बसायचे आणि स्थानिक नागरिक त्यांचे संरक्षण करायचे. परंतु, या संरक्षणाच्या बदल्यात पाकिस्तानी राजवटीने जनतेला फक्त बेरोजगारी, रुग्णालये व शाळांचा अभाव आणि हिंसाचार दिला. आपल्या मूलभूत हक्कांची मागणी करणार्या निष्पाप नागरिकांवर गोळीबार करून १०० हून अधिक जणांची हत्या करण्यात आली, असा आरोपही केला.
Related
Articles
पावसाच्या लहरीपणामुळे भविष्यात पाणीटंचाईची समस्या उद्भवण्याची शक्यता
12 Oct 2026
‘नाना’ हे विचारांचे मोहोळ; बळकट आवाज हरपला
09 Oct 2026
हुथींच्या कचाट्यात सौदी अरेबिया...
13 Oct 2026
भारताच्या ‘बिग कॅट अलायन्स’मध्ये घाना
09 Oct 2026
कात्रज बोगद्याजवळ उभ्या कंटेनरला दुचाकीची धडक
13 Oct 2026
पाणीपुरवठ्यासाठी 220 कोटींच्या कामांना मंजुरी
08 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात