बारा लाख विद्यार्थ्यांना देणार सायकली : सुवेंदू   

कोलकाता : राज्यातील १२ लाख ५९ हजार विद्यार्थ्यांना सारथी योजनेअंतर्गत या शैक्षणिक वर्षात सायकलींचे वाटप केले जाईल, अशी घोषणा पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी मंगळवारी केली. हावडातील शाळेत सायकल वितरणाचा सोहळा अधिकारी यांच्या हस्ते झाला. ते म्हणाले,  तृणमूलने सबुज साथी योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाच्या सायकलींचे वाटप केले होते.

Related Articles