भुवनेश्वर : खाणकामाशी संबंधित नवीन कायदा रद्द करण्यात यावा, यासह अन्य दोन प्रमुख मागण्यांवरुन ‘इंडिया’ आघाडीने ८ ऑक्टोबर रोजी ’ओडिशा बंद’ची मंगळवारी घोषणा केली. तसेच, ‘इंडिया’ आघाडीच्या सदस्यांनी मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांच्या निवासस्थानाजवळ निदर्शने केली. या आंदोलनात काँग्रेस, सीपीआय (एम), सीपीआय, सीपीआय (एमएल) लिबरेशन, फॉरवर्ड ब्लॉक, राष्ट्रवादी काँग्रेस , समाजवादी पक्ष आणि आरजेडीसह अन्य पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलकांनी सुरुवातीला विधानसभेला घेराव घालण्याची योजना आखली होती. परंतु, पावसाळी अधिवेशन एक दिवस आधीच अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आल्यामुळे त्यांनी आपला मोर्चा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे वळवला. पोलिसांनी रोखल्यानंतर आंदोलक आणि सुरक्षा कर्मचारी यांच्यात झटापट झाली.
Fans
Followers